Lokmat Sakhi >Social Viral > 'पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो मरना..'विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तर पत्रिकेत असं का लिहिलं? व्हिडिओ व्हायरल

'पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो मरना..'विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तर पत्रिकेत असं का लिहिलं? व्हिडिओ व्हायरल

'Padh ke kya karna hai': Student's philosophical quote at the end of maths exam leaves internet in splits : गणिताच्या उत्तर पत्रिकेच्या शेवटी विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 06:30 PM2024-07-05T18:30:31+5:302024-07-05T18:31:32+5:30

'Padh ke kya karna hai': Student's philosophical quote at the end of maths exam leaves internet in splits : गणिताच्या उत्तर पत्रिकेच्या शेवटी विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की..

'Padh ke kya karna hai': Student's philosophical quote at the end of maths exam leaves internet in splits | 'पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो मरना..'विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तर पत्रिकेत असं का लिहिलं? व्हिडिओ व्हायरल

'पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो मरना..'विद्यार्थ्याने गणिताच्या उत्तर पत्रिकेत असं का लिहिलं? व्हिडिओ व्हायरल

'एक कागदाचा तुकडा भविष्य नाही ठरवू शकत' हे वाक्य आपण अनेक मुलांकडून ऐकलं असेल (Social Viral). बरीच मुलं शिकून मोठी झालीत. शिकून अनेकांचं भलं झालं आहे (Viral Video). काहींनी बिझनेस तर काहींना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. शिक्षण किती गरजेचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. एका विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत मजेशीर कोट लिहिले आहे.

पेपर तपासणारे परीक्षकांनी त्या मुलाचा पेपर तपासतानाचा व्हिडिओ तयार केला, आणि सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियात व्हायरल झाला तर खरा, पण पठ्ठ्याने नक्की लिहिलं होतं तरी काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दरम्यान 'तो' विद्यार्थी नक्की कोण? त्याने असं काय लिहिलं उत्तर पत्रिकेत? पाहूयात('Padh ke kya karna hai': Student's philosophical quote at the end of maths exam leaves internet in splits).

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो..

हा व्हायरल व्हिडिओ राकेश शर्मा या शिक्षकाने पेपर तपासताना शूट केला आहे. यात शिक्षक विद्यार्थी हर्ष बेनिवालचा गणिताचा पेपर चेक करीत आहेत. यामध्ये विद्यार्थ्याने सुरुवातीला गणितं व्यवस्थित सोडवली आहेत. पेपरच्या शेवटी त्याने मजेशीर कोट लिहिला आहे. जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

व्हिडिओच्या सुरुवातीला परीक्षक विद्यार्थ्याच्या परीक्षेची उत्तरपत्रिका तपासत आहेत. शिवाय प्रत्येक प्रश्नावर किती गुण मिळवले हे देखील सांगितले. उत्तर पत्रिकेच्या शेवटी विद्यार्थ्याने 'अभ्यास करून काय होणार आहे? एक दिवस तर सगळ्यांना मरायचं आहे. तरी देखील पास होण्याची इच्छा आहे..' असं त्याने लिहिलं आहे. यावर परीक्षकाने शेवटी, 'चलो बेटा तुम पास हो गये' असं म्हणत विद्यार्थ्याचे गुण पाहून पास केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Web Title: 'Padh ke kya karna hai': Student's philosophical quote at the end of maths exam leaves internet in splits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.