Lokmat Sakhi >Social Viral > अजबच योगायोग! आई-वडिलांसह ७ मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस; केला आगळावेगळा विक्रम

अजबच योगायोग! आई-वडिलांसह ७ मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस; केला आगळावेगळा विक्रम

Pakistan family unique world record birthday : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या एका कुटुंबात नऊ लोक आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:41 PM2023-07-13T12:41:19+5:302023-07-13T14:13:57+5:30

Pakistan family unique world record birthday : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या एका कुटुंबात नऊ लोक आहे.  

Pakistan family unique world record birthday of parents and 7 children on the same day | अजबच योगायोग! आई-वडिलांसह ७ मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस; केला आगळावेगळा विक्रम

अजबच योगायोग! आई-वडिलांसह ७ मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस; केला आगळावेगळा विक्रम

पाकिस्तातून आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लरकानामधील एका कुटुंबाने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कुटुंबातील सर्व नऊ सदस्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, ते म्हणजे घरातल्या सर्वांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या एका कुटुंबात नऊ लोक आहे.  वडील अमीर अली, आई खुदेजा आणि त्यांची सात मुले सिंधू, सासुई, सपना, अमीर, अंबर, अम्मार, अहमर या सर्वांचा जन्मतारीख एकच आहे. योगायोगाने त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

सर्व मुलांचे वय 19-30 वर्षां दरम्यान आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला होता. एका दिवसात कुटुंबातील सर्वाधिक सदस्यांचा जन्म एकाच दिवशी होण्याचा हा जागतिक विक्रम आहे. (Pakistan family unique world record birthday of parents and 7 children on the same day)

पुढच्या महिन्याचा १ ऑगस्ट हा अमीर अली आणि खुदेजा यांच्यासाठी खूप खास दिवस आहे. वास्तविक, हा दिवस त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि या दिवशी पती-पत्नीचा वाढदिवस देखील आहे. लग्नानंतर बरोब्बर एक वर्षानंतर म्हणजे १ ऑगस्ट रोजी मोठ्या मुलीचा जन्म झाला. आमिर-खुदेजाने 1991 मध्ये वाढदिवसाच्या दिवशी लग्न केले होते.

एकाच दिवशी सर्वाधिक भावंडांचा जन्म होण्याचा विक्रमही सात मुलांनी केला आहे. हा विक्रम यापूर्वी 1952 ते 1966 दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या अमेरिकन कमिन्स कुटुंबातील पाच मुलांकडे होता. पाकिस्तानी कुटुंबाचा शोध लागेपर्यंत या कुटुंबाचे फक्त नाव रेकॉर्डवर होते. अमेरिकन भावंडसुद्धा एकाच दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

1 ऑगस्ट 1992 रोजी आपल्या पहिल्या अपत्या सिंधूच्या जन्मानंतर अमीर अली खूप आश्चर्यचकित आणि आनंदी देखील होते, त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचाही त्यााच दिवशी वाढदिवस होता.  प्रत्येक मूल एकाच तारखेला जन्माला आल्याने तो आणि त्याची पत्नी खुदेजाला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी ते अल्लाहची देणगी म्हणून पाहिले.  प्रत्येक मूल एकाच तारखेला जन्माला येईल अशी कोणीही कल्पना करू शकत नाही. त्यांनी असा दावा केला आहे की, खुदेजाची प्रसूती कधीच लवकर झाली नाही किंवा सी-सेक्शनद्वारे कोणत्याही मुलाची प्रसूती वेळेआधी झाली नाही.

Web Title: Pakistan family unique world record birthday of parents and 7 children on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.