असे म्हणतात संपूर्ण जगात आपल्यासारखे दिसणारे ७ जण असतात. सोशल मिडीयावर अनेकांचे डॉपेलगँगर देखील आपण पाहिले असतील. अभिनेत्री मधुबालापासून ते आलिया भट्टपर्यंत, हुबेहूब दिसणारे व्यक्ती सोशल मिडीयावर रातोरात स्टार झालेत. सध्या सोशल मिडीयावर विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चनची लुक-अलाईक व्यक्ती धुमाकूळ घालत आहे. ही व्यक्ती भारतातील नसून, पाकिस्तानात राहणारी आहे.
तिचे डोळे, नाक, ओठ, चेहऱ्यावरील हाव भाव हे हुबेहूब ऐश्वर्या सारखेच आहे. मात्र, तिला ऐश्वर्याची डॉपेलगँगर म्हटलेलं आवडत नाही. ती महिला नक्की कोण आहे? तिला ऐश्वर्याची हमशकल म्हटल्यावर राग का येतो? पाहूयात(Pakistan’s Aishwarya Rai Bachchan is sick of being called that. Here’s why).
ऐश्वर्यासारखी हुबेहूब दिसणारी ती महिला नक्की कोण?
चांदीचे पैंजण काळे पडले? अर्धा चमचा टूथपेस्ट, काही मिनिटात पैंजण चकाचक
खरंतर काहीदिवसांपूर्वी पाकिस्तानात राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती महिला हुबेहूब ऐश्वर्या रायसारखी दिसत आहे. तिला पाहून नेटकरी गोंधळून गेले होते. त्या महिलेचे नाव कंवल चीमा असून, तिला पाकिस्तानची ऐश्वर्या राय देखील म्हटले जाते.
इंटरनेटवर झाला व्हिडिओ व्हायरल
नुकताच कंवल चीमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका रिपोर्टरने तिला ऐश्वर्या रायच्या लूक अलाईक बद्दल प्रश्न विचारला होता. रिपोर्टरने तिला ऐश्वर्या रायबद्दल प्रश्न विचारताच तिने उत्तर देण्यास नकार दिला. पण, नंतर ती म्हणते - 'हो, बऱ्याचदा लोकं मला असे म्हणतात, की मी अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसते. प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकाची स्वतःची एक ओळख आहे, आणि लोकांनी अशी तुलना करू नये, असे मला वाटते. लोकांनी मला माझ्या कामासाठी ओळखावे अशी माझी इच्छा आहे.'
सणासुदीच्या स्वयंपाकात भांडी करपली तर..? टेन्शन विसरा, ३ उपाय - मेहनत न करता भांडी होतील चकाचक
मात्र, कंवलचा मनोरंजन जगताशी काहीही एक नातं नाही आहे. ती एक उद्योजिका आहे. ती फक्त दिसायलाच नसून, तिचा आवाजही ऐश्वर्याशी मिळता - जुळता आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. तर काहींनी पाकिस्तानी ऐश्वर्या खऱ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त सुंदर आहे, असे म्हटले आहे.