श्रावण महिना (Shravan) हा धार्मिक कार्यक्रमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच तर श्रावणात प्रत्येक दिवशी काही ना काही धार्मिक कार्यक्रम, पूजा, प्रार्थना केल्या जातात. श्रावणी सोमवार, मंगळागौरी, श्रावणी शनिवार, शुक्रवारचं व्रत हे तर सगळं श्रावणात केलं जातंच. पण त्यासोबतच श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा (how to do satyanarayan pooja?) घातली जाते. आता अशीच एक सत्यनारायणाची पूजा एका घरी घातली गेली आणि तिच्यातल्या वेगळेपणामुळे (Panditji telling Satyanarayan Katha in English) ती सोशल मिडियावर भन्नाट व्हायरलही झाली. या अनोख्या पुजेचा हा व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे.(viral video of satyanarayan pooja)
@KulwantJanjue या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे, त्यावरून पुजेला बसलेलं ते सगळं कुटूंब दक्षिण भारतीय असावं, असं वाटतं. पण घराच्या रचनेवरून पुजा नेमकी भारतात सांगण्यात येत आहे, की ते परदेशात राहणारे भारतीय आहेत, हे मात्र लक्षात येत नाहीये. पण या सगळ्यांपेक्षाही जास्त भाव खाऊन जातात ते पूजा सांगणारे गुरुजी. कारण हे गुरुजी सत्यनारायणाची कथा थेट अस्खलित इंग्रजीतून सांगत आहेत. त्यामुळेच तर ते सोशल मिडियावर कौतूकाचा विषय ठरले असून त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
Satyanarayan katha in English, for new generation understanding pic.twitter.com/ptsiVQX5dg
— KulwantSingh ਲੰਬੜਦਾਰ 🇮🇳 (@KulwantJanjue) August 10, 2022
पुर्वी या सगळ्या कथा संस्कृतमध्ये असत. पण भाषा बदलली, संस्कृत जाणणारे हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे मग मराठी, हिंदी अशा भाषांमध्ये सत्यनारायण कथा येऊ लागली. पण आता परदेशात राहणारी भारतीय वंशाची पुढची पिढी अतिशय जुजबी हिंदी जाणणारी आहे. मग पुजेमध्ये नेमका काय संदेश दिला आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यांना येणाऱ्या भाषेतून पुजेचा अर्थ त्यांना समजावून सांगणं गरजेचंच आहे. त्यामुळेच तर भाषेपेक्षा श्रद्धा आणि भावना महत्त्वाची आहे, असं अनेक नेटकरींना वाटत आहे.