Lokmat Sakhi >Social Viral > पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

Paris Fashion Week: Luminous garden flowers in dresses light up runway : अबब ! मॉडेल्सनी घातलेल्या स्कर्टवर चक्क लायटिंग आणि जिवंत फुलपाखरांची डिजाइन, भलतं अजब फॅशन प्रकरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 05:29 PM2023-09-29T17:29:16+5:302023-09-29T17:43:18+5:30

Paris Fashion Week: Luminous garden flowers in dresses light up runway : अबब ! मॉडेल्सनी घातलेल्या स्कर्टवर चक्क लायटिंग आणि जिवंत फुलपाखरांची डिजाइन, भलतं अजब फॅशन प्रकरण...

Paris Fashion Week: Undercover SS24 takes ‘City of Lights’ theme to heart with lamp dresses. | पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

पॅरिस फॅशन वीकमध्ये घडले ‘असे’ काही, ज्याची कुणालाच कल्पना नव्हती, स्कर्टवर पेटले दिवे आणि फुलपाखरांची तर...

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन शोज किंवा फॅशन वीक नक्कीच पाहिले असतील. हे मोठमोठाले फॅशन वीक आणि त्यातील मॉडेल्सनी परिधान केलेले अजब - गजब, रंगीबेरंगी कपडे हे सगळे आपल्याला काही फारसे नवीन नाही. सध्या जगभरात फॅशनची एक विचित्र क्रेझ पाहायला मिळत आहे. लोक विविध प्रकारच्या फॅशनचा वापर करत आहेत. काही काळापासून फॅशन इंडस्ट्री ही सतत बदलत आहे. दररोज काही नवीन फॅशन किंवा स्टाइल लोकांना आश्चर्यचकित करते. असेच काहीसे नुकत्याच पार पडलेल्या (Paris Fashion Week) पॅरिस फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाले. यावेळी येथील विविध प्रकारच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले नाही तर सर्वांनाच चकित केले आहे(undercover's jun takahashi sent glowing terrariums down the runway at paris fashion week).

१९८१ सालच्या बॉलिवूडमधील याराना चित्रपटांतील अभिताभ बच्चनवर चित्रित झालेलं "सारा जमाना हसींनो का दिवाना" हे गाणं आजही सगळ्यांच्या ओठांवर असते. हे गाणं लक्षात राहण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्यातील अमिताभजींचे कपडे. त्यांनी परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसवर संपूर्ण लायटिंग केली होती. फ्रान्सच्या राजधानीत सध्या सुरू असलेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये असे काही घडले, ज्याची कदाचित कुणालाही अपेक्षा नसेल. नेमकं या पॅरिस फॅशन वीकमध्ये काय घडलं ? ते पाहूयात(Paris Fashion Week: Undercover SS24 takes ‘City of Lights’ theme to heart with lamp dresses).

पॅरिस फॅशन वीकमधील अनोख्या ड्रेसची सर्वत्र चर्चा... 

पॅरिस फॅशन वीक २०२३ (Paris Fashion Week) मध्ये, मॉडेल्सनी घातलेला ड्रेस सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. जपानी डिझायनर जून ताकाहाशी (Jun Takahashi) यांनी डिजाईन केलेले डिझायनर कपडे या सर्व मॉडेल्सनी घालून मिरवले आहेत. जून ताकाहाशी हा एक प्रसिद्ध जपानी फॅशन डिझायनर आहे ज्याने अंडरकव्हर ब्रँड तयार केला आहे. पॅरिस फॅशन विकच्या (Paris Fashion Week) निमित्ताने त्यांनी आपल्या स्प्रिंग समर २०२४ कलेक्शनचे ओपनिंग केले आहे. या कलेक्शन अंतर्गत त्यांनी आपल्या एका मॉडेलला चक्क लायटिंगने डिजाईन केलेला तसेच खरी फुलं व फुलपाखरे यांचा वापर करून सजविलेला एक झक्कास ड्रेस दिला आहे. जून ताकाहाशी (Paris Fashion Week : Jun Takahashi Lights Up The Ramp With Spring/Summer Collection) यांनी डिजाईन केलेले कपडे थोडेसे विचित्र आणि अनोखे वाटत असले तरीही तिच्या लॅम्प स्कर्टने लोकांना खरोखरच आश्चर्यचकित केले आहे. 

सारा अली खानच्या रंगबिरंगी क्रोशेट टॉप आणि स्कर्टची चर्चा, हिप्पी फॅशनची अनोखी स्टाईल...

जून त्याच्या अनोख्या डिझाईन्स आणि नाविन्यपूर्ण कारागिरीसाठी ओळखला जातो आणि या पॅरिस फॅशन वीकमध्ये त्याने आपल्या असामान्य पोशाखांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने रॅम्पवर चमकदार स्कर्ट्सचे कलेक्शन दाखवले. आतून चमकणारे नाविन्यपूर्ण स्कर्ट परिधान करून मॉडेल बाहेर आल्या तेव्हा क्षणभर त्यांना आगीत गुंडाळल्यासारखा भास झाला होता.  

दूर देशी जाणाऱ्या लेकीला वडिलांचा अनोखा निरोप, बापाचे काळीज असे वेडे.. पाहा व्हायरल व्हिडिओ...

वजनावरुन लोक तर टोमणे मारतच पण माझी आईसुद्धा - विद्या बालन सांगते, वजनामुळे काय सहन केलं...

या मॉडेलने घातलेल्या ड्रेसमध्ये खालच्या बाजूला स्कर्टला एक गोलाकार लाईट जोडला आहे. एवढेच नव्हे तर या ड्रेसमध्ये विविध रंगी गुलाबाची फुल तसेच जिवंत इथून तिथून नाचणारी फुलपाखरं देखील दिसत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांना ही प्रकाशमय रचना आवडली, तर काही लोकांनी स्कर्टमध्ये लायटिंग व जिवंत फुलपाखरांना कैद करुन ठेवल्यामुळे या ड्रेसला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. काही ड्रेसेसमध्ये एक्वैरियमसारखा लुक होता. तर इतर काही ड्रेसमध्ये रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे आणि सुंदर कलाकृती होत्या. रॅम्पवर पिवळे, पांढरे आणि चमकदार कपडे दिसले, ज्याने संपूर्ण शो उजळून टाकला होता. 

नेटकरी हा ड्रेस पाहून म्हणतात... 

एका नेटकाऱ्याने ड्रेसमध्ये फुलपाखरांना कैद केले हे पाहून, किती क्रूर आहे हे ? अशी कमेंट केली आहे. हा ड्रेस घालूंन बसायचे झाले तर कसे बसायचे ? असा प्रश्न दुसऱ्या नेटकऱ्याने केला आहे. हा ड्रेस घातल्यावर गार्डनमध्ये चालल्याचा भास होईल अशी कमेंट् देखील केली आहे. हे असे ड्रेस कोण विकत घेत असेल असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. अशा प्रकारे नेटकऱ्यांनी हा ड्रेस बघून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Paris Fashion Week: Undercover SS24 takes ‘City of Lights’ theme to heart with lamp dresses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.