Join us  

चुपके से लग जा गले.. पाकिस्तानी पावरी गर्लचा नवा व्हिडिओ, गाणं ऐकून दोन्ही देशातले नेटिझन्स म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 5:31 PM

Pawri Girl Latest Viral Video Singing Chupke Se Lag Ja Gale Song Dananeer Mobeen : सोशल मीडियावर दानानीरने गायलेलं हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून असंख्य जणांनी ते पाहिलं आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले असून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आता ती बॉलिवूडमधील हे गाणे गायल्याने पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली आहे.

पावरी हो रही है या व्हिडिओमुळे सोशल मीडियात एका रात्रीत प्रसिद्ध झालेली पाकिस्तानची दानानीर मोबीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती वेगळ्याच रुपात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आली आहे. सामान्य लोकांपासून तर पाकिस्तानी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच तिची भरपूर तारीफ करताना दिसत आहेत. भारतीय नागरीकही तिचे कौतुक करताना दिसत आहेत. याचे कारण आहे तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ. नुकताच तिने एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘चुपके से लग जा गले’ हे गाणं गाताना दिसत आहे. साथिया चित्रपटातील हे गाणं सुरात गायल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे (Pawri Girl Latest Viral Video Singing Chupke Se Lag Ja Gale Song Dananeer Mobeen). 

साथिया चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं रसिकांना खूप आवडलं होतं. इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दानानीर लिहीते, मला हे गाणं खूप आवडलं आणि ते मला गाऊन पाहायचं होतं. मी पेशाने गायिका नाही त्यामुळे कृपया मला हेट करु नका. सोशल मीडियावर दानानीरने गायलेलं हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून असंख्य जणांनी ते पाहिलं आहे. ४ दिवसांत १ लाखाहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून सेलिब्रिटींसह अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

काहींनी तिच्या आवाजाचे कौतुक केले आहे तर काहींनी तिच्या दिसण्याचे कौतुक केले आहे. पावरी हो रही है च्या व्हिडिओनंतर दानानीर चांगलीच प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने काही पाकिस्तानी शो ही केले. आता ती बॉलिवूडमधील हे गाणे गायल्याने पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली आहे. परदेशातील तरुणींनी भारतीय गाणी म्हणण्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच जपानमधील एका तरुणीने पुण्याच्या गणेशोत्सवात मराठी गाणं सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले असून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचू शकते. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया