Lokmat Sakhi >Social Viral > रांगोळी काढायला जमत नाही? चिंता सोडा, हँगर आणि चमच्याने काढा मोराची सुंदर डिझाईन

रांगोळी काढायला जमत नाही? चिंता सोडा, हँगर आणि चमच्याने काढा मोराची सुंदर डिझाईन

Peacock rangoli design made by using HANGER : १० मिनिटात तयार होईल मोराची सुंदर रांगोळी, फक्त काढताना सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 11:40 AM2023-11-11T11:40:56+5:302023-11-11T11:45:01+5:30

Peacock rangoli design made by using HANGER : १० मिनिटात तयार होईल मोराची सुंदर रांगोळी, फक्त काढताना सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा..

Peacock rangoli design made by using HANGER | रांगोळी काढायला जमत नाही? चिंता सोडा, हँगर आणि चमच्याने काढा मोराची सुंदर डिझाईन

रांगोळी काढायला जमत नाही? चिंता सोडा, हँगर आणि चमच्याने काढा मोराची सुंदर डिझाईन

आली आली दिवाळी, दारात काढा सुंदर-सुबक रांगोळी. सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरु आहे. रोषणाई, दिवे, फटाके, फराळ, नवीन कपडे या सगळ्या गोष्टींमुळे दिवाळी हा सण अधिक आकर्षक वाटतो. दिवाळी सणानिमित्त आवर्जुन दारात रांगोळी काढतात. रांगोळीमुळे दाराला शोभा येते. पण काहींना रांगोळी काढायला जमते तर, काहींना जमत नाही. अशा वेळी आपण इतर साहित्यांचा वापर करून दारात रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो.

जर आपल्याला सुंदर-सोपी रांगोळी काढायची असले तर हँगर, चमचा यासह इतर साहित्यांचा वापर करून दारात मोराची रांगोळी काढू शकता. अनेकांना मोराची रांगोळी आवडते. पण मोराची रांगोळी काढायला फार अवघड. पण आपल्याला जर सोप्या पद्धतीने सुंदर मोराची रांगोळी काढायची असेल तर, हँगरचा वापर करून सुबक रांगोळीची डिझाईन काढा(Peacock rangoli design made by using HANGER).

चांदीचे पैंजण काळे पडले, पण ऐन दिवाळीत कसे घालणार? ३ सोपे उपाय, दोन मिनिटांत चमकतील पैंजण

मोराची डिझाईन काढण्यासाठी हँगरचा वापर करा

कपडे लटकवण्यासाठी आपण हँगरचा वापर करतो. याच हँगरचा वापर करून आपण सुंदर मोराची रांगोळी काढू शकता. जर आपल्याला रांगोळी काढायला जमत नसेल तर, चिंता करू नका, हँगर घ्या आणि मोराची सुंदर रांगोळी काढायला सुरुवात करा.

माझेच इन्स्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीत असा प्रश्न पडलाय? ३ टिप्स, पाहा व्हायरलची खास गोष्ट

सर्वप्रथम, पेन्सिल चॉकच्या मदतीने फरशीवर मोर काढून घ्या. नंतर त्यावर हँगर ठेवा, आणि मोराचा पिसारा काढून घ्या. नंतर त्यावर पांढऱ्या रांगोळीने बोर्डर तयार करा, व त्यात आवडीनुसार रंग भरा. आपण मोराचा पिसारा तयार करण्यासाठी चमचा आणि माचीसच्या काडीचा देखील वापर करू शकता. जर आपल्याला रांगोळीत रंग भरायला जमत नसेल तर, आपण फुलांचा देखील वापर करू शकता. फुलांच्या वापराने देखील सुंदर रांगोळी तयार होईल.

Web Title: Peacock rangoli design made by using HANGER

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.