सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लाटण्याचा अनोख्या पद्धतीनं वापर कसा करायचा हे व्हायरल होत आहे. वजन कमी करण्यासाठी लाटण्याचा वापर करण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक आपल्या पोटावर लाटणं फिरवत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. (People rolling belans on their stomach to reduce belly fat goes viral internet shocked says whats happening)
हा व्हायरल व्हिडिओ चिराग बडजात्या नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये, ट्रेनर फिटनेस क्लास घेताना दिसतो. स्त्री-पुरुषांचा गट आणि प्रशिक्षकही पोटावर रोलिंग पिन घासताना दिसतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात लाटणं होतं. हा नवीन प्रकार अनेकांनी पहिल्यांदाच पाहिला. पोट कमी करण्यासाठी योगा, कार्डिओ, एब्स वर्कआऊट तुम्ही अनेकदा पाहिला असेल पण लाटण्यानं खरंच पोटावरची चरबी कमी करता येते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांची मालिका सुरू झाली आहे. एका युजरने विनोदी कमेंट केली की, "मला आशा आहे की ते लोक चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये परत जाणार नाही."
पोट कमी करण्यासाठी उपाय
१) वजन कमी करायचे असेल तर रात्रीचे जेवण ७ वाजेपर्यंत करा. जे काही खावे ते वेळेवर खा. तुमचे जेवण आणि झोप यामध्ये किमान ३ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. अन्न उशिरा खाल्ले तर अन्न उशिरा पचते. यामुळे लठ्ठपणाही झपाट्याने वाढतो.
२) तुमच्या आहारात प्रथिने आणि फायबर समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. रात्रीचे जेवण शक्य तितके हलके घ्या. रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या, सूप आणि डाळ रोटी यांचा समावेश करा. त्यामुळे पोट सहज भरेल आणि कॅलरीजही कमी होतील.
3) रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्या. यामुळे तुम्हाला अन्न पचणे सोपे होईल. गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते. विशेषत: जेवल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा.