लहान मुलांचं एक वेगळंच विश्व असतं. त्यांच्या त्या इवल्याशा विश्वात ते कायम गुरफटलेले असतात. मोठ्या माणसांच्या काही गोष्टी ते अचूक हेरतात आणि त्यांच्या खेळामध्ये किंवा त्यांच्या रुटीनमध्ये त्या अचूकपणे आणण्याचा प्रयत्न करतात. जी लहान मुलं घरी एकटी असतात, ती पाळीव प्राण्यांशी (pet) खूप जास्त अटॅच होतात असंही सांगितलं जातं. अनेक मुलांना बोलतं करण्यासाठी, त्यांच्यातला एकलकोंडेपणा घालविण्यासाठी त्यांना पेट थेरपी देण्याचा म्हणजेच त्यांच्यासाठी एक पाळीव प्राणी आणण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. मग त्या प्राण्यामध्ये आणि मुलांमध्ये एक सुंदर नातं तयार होतं. असाच लहान मुलीचा आणि तिच्या पाळीव मांजराचा (Pet Cat And a Little Girl) एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
@Yoda4ever या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी चिमुकली अवघी ४ ते ५ वर्षांची वाटते. "Little girl teaches a cat how to use a treadmill..." अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.
ड्रॅगन फ्रुट कसं कापायचं? शेफ कुणाल कपूरने सांगितलेली खास युक्ती..
या व्हिडिओमध्ये ती चिमुकली, तिचं काळ्या रंगाचं पाळीव मांजर आणि एक ट्रेडमिल अशा गोष्टी दिसतात. सुरुवातीला ती मुलगी ट्रेडमिल सुरू करते आणि त्यावर चालते. नंतर तिच्या शेजारी असणाऱ्या तिच्या मांजराशी ती गप्पा मारते आणि त्याला ट्रेडमिलवर कसं धावायचं ते सांगते.
ते ऐकून ते हुशार मांजर ट्रेडमिलजवळ येतं. पंजा लावून नेमका हा काय प्रकार आहे, ट्रेडमिल कसं हलत आहे, याचा अंदाज घेतं. त्यानंतर हळूच ट्रेडमिलवर पाय ठेवून उभं राहतं आणि घसरगुंडीप्रमाणे घरंगळून खाली येतं.
५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..
त्यानंतर पुन्हा ती मुलगी कसं करत आहे, हे पाहतं आणि मग अगदी हुशारीने त्यावर चालतं. हा व्हिडिओ पाहून ती मुलगी तर नेटीझन्सला आवडली आहेच, पण त्या मांजराचंही कमालीचं कौतूक होत आहे.