Join us

असं कुणी करतं का? भाजीवाल्याने दुकानात लावला डोळे वटारून पाहणाऱ्या महिलेचा फोटो, लोक म्हणाले.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2024 16:39 IST

Photo Of Angry Woman At Bengaluru Vegetable Market: कोण काय करेल काही सांगताच येत नाही. हा बेंगलोर शहरातला भाजीवालाही तसाच.. बघा त्याने नेमकं काय केलं..

ठळक मुद्देबाजारात भाज्या घेत फिरत असताना अचानक हा फोटो जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा क्षणभर हसावं की घाबरावं हे कळलंच नाही, अशी कमेंटही एकाने दिली आहे.

प्रसिद्धीसाठी किंवा मग इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी कोण कधी काय करेल काही सांगताच येत नाही. त्यात जे लोक व्यवसायात असतात आणि ज्यांंना इतर स्पर्धकांच्या तुलनेत आपला व्यवसाय वाढवायचा असतो, अशा लोकांचं तर या बाबतीत खूपच मजेशीर डोकं चालतं. ग्राहकांना आपल्या दुकानापर्यंत घेऊन येण्यासाठी काही जणांकडे एक से एक भन्नाट आयडिया असतात. बेंगलोर शहरातल्या एका भाजीवाल्याचं त्यासाठीच तर कौतूक होत आहे. बघा त्याने नेमकं काय केलं...

 

जोपर्यंत आपण समोरच्या ग्राहकाला काही वेगळं दाखवत नाही किंवा त्याला आपल्या दुकानापर्यंत खेचून आणण्यासाठी काही वेगळं करत नाही, तोपर्यंत आपल्याकडचा ग्राहकवर्ग वाढत नाही.

५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

असंच त्या भाजीवाल्याला वाटलं आणि त्याने ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क एका डोळे वटारून बघणाऱ्या चिडखोर महिलेचा फोटो त्याच्या भाजीच्या दुकानात लावला.  Niharika__rao या सोशल मिडिया हॅण्डलवरून त्याच्या दुकानाचा फोटो व्हायरल करण्यात आला असून त्याला I am so glad I stepped out today असं मस्त मजेशीर कॅप्शन देण्यात आलं आहे.

 

त्याने जो फोटो दुकानात लावला आहे, तो काही महिन्यांपुर्वी सोशल मिडियावर खूप व्हायरल होत होता. त्याच फोटोचं प्रिंटआऊट काढून त्याने ते मोठं करून दुकानात लावलं आहे. बाजारात भाज्या घेत फिरत असताना अचानक हा फोटो जेव्हा डोळ्यासमोर आला तेव्हा क्षणभर हसावं की घाबरावं हे कळलंच नाही, अशी कमेंटही एकाने दिली आहे.

कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

त्या दुकानदाराने तो फोटो लावण्यामागचा नेमका उद्देश काय, हे स्पष्ट झालेलं नाही, पण तो पाहून मात्र कित्येकांना मजा वाटतेय हे नक्की. बाजारात एखाद्या गोष्टीसाठी एखादं मूल आईकडे हट्ट करत असेल तर त्या बाळाला घाबरविण्यासाठीही त्या फोटोचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाभाज्या