Join us

बाल्कनीत फडफडणारच नाहीत कबुतर, ३ उपाय पाहा-कबुतरांचा त्रास कायमचा होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 17:48 IST

Pigeons will not flutter in the balcony, see 3 solutions - the trouble of pigeons will be reduced forever : कबुतरांच्या वावराला वैतैगला आहात ? हे सोपे घरगुती उपाय करा.

आपण घर अगदी साफ ठेवतो. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा येऊ देत नाही. साधा घाणेरडा वासही येऊ देत नाही. (Pigeons will not flutter in the balcony, see 3 solutions - the trouble of pigeons will be reduced forever )घराच्या खोल्या ज्या प्रकारे आपण साफ करतो, त्याच प्रकारे आपण घराची गॅलरी- बाल्कनीही साफ ठेवतो. वाऱ्यामुळे येणारी धूळ साफ करतो. उडून येणारा कचरा साफ करतो. सगळं व्यवस्थित केल्यानंतरही समाधान मिळत नाही. कारण आपण बाल्कनीतून घरात आलो की, लगेच एक नको असलेला पाहुणा त्या बाल्कनीमध्ये येतो. कबुतरं अगदी हैराण करून सोडतात. कबुतरांचा वावर जर घरात होत असेल तर तब्येतीसाठीही ते चांगले नाही. (Pigeons will not flutter in the balcony, see 3 solutions - the trouble of pigeons will be reduced forever)काही अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की कबुतरांमुळे श्वासोच्छवासाचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या कबुतरांना लांब ठेवणेच योग्य. 

काहीही करा कबुतर जाता जात नाहीत. हकलले तरी पुन्हा येतात. बाल्कनीमध्ये त्यांचे मल पडलेले असते. त्याला वास प्रचंड घाण येतो. तसेच त्यामध्ये घातक घटकही असतात. फरशीलाही डाग पडतात. काही साधे उपाय आहेत जे केल्याने कबुतर बाल्कनीमध्ये येणार नाहीत. फार जुन्या काळापासून चालत आले आहेत. तसेच अनेकांना चांगला फायदाही झाला आहे.  

१. फॉईल पेपरचा वापर आपण अन्न गरम ठेवण्यासाठी करतो. मात्र तोच फॉईल पेपर वापरून घरातला कबुतरांचा वावर थांबवता येतो. बाल्कनीमध्ये आपण झाडे लावतो. त्याच्या बाजूला फॉईल पेपरचा तुकडा लटकवायचा. चार ते पाच तुकडे बाल्कनीमध्ये विखुरायचे. कबुतर बाल्कनीमध्ये येणार नाहीत.

२. आजकाल आता सीडी वापरली जात नाही. मात्र आधी गाण्यांची चित्रपटांची चमकदार सीडी मिळायची. ती आताही सहज उपलब्ध होईल. त्या सीडीला भोक पाडून दोरी बांधायची. बाल्कनीमध्ये ती सीडी लटकवायची. सीडीचा मागचा भाग चमकतो. कबुतरांना चमकणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. ती सीडी बघून ते बाल्कनीत येणार नाहीत.

३. तिखट पदार्थांचा वास पक्ष्यांना सहन होत नाही. त्यामुळे लाल तिखट एका कागदावर किंवा वाटीमध्ये घ्या. आणि बाल्कनीच्या कोपर्‍यामध्ये ठेवा. त्याच्या वासामुळे बाल्कनीमध्ये येण्याचा प्रयत्नही कबुतर टाळेल.  

टॅग्स :होम रेमेडीकबुतरस्वच्छता टिप्स