पापा कहते है बडा नाम करेगा... असं मनात येतंच, वाटतं की आपल्या आईबाबांना अभिमान वाटेल असं काम करावं. दाखवावं त्यांना की आपल्या मुलांनी किती मोठी भरारी घेतली आहे. तेच आपलं स्वप्न पायलट असलेल्या एका तरुण मुलानं नुकतंच साकार झालं. तो जो विमान उडवत जयपूरला जाणार होता त्याच विमानानं त्यानं आपल्या आईबाबांनाही जयपूरला नेलं. तो पायलट झाल्यापासून पहिल्यांदा त्याचे आईबाबा तो उडवत असलेल्या विमानात येणार होते. त्याच्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता. त्यानं एक लहानसा व्हिडिओ करत आपली पालकांप्रती कृतज्ञताही त्या व्हिडिओतून व्यक्त केली. (Pilots sweet surprise for his parents will melt your heart watch what he did)
पायलट कमल कुमारनं इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये कमल त्याच्या आई-वडिलांसोबत कॉकपिटमध्ये बसल्याची छायाचित्रेही आहेत. व्हिडिओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जवळपास 90,000 लाइक्स मिळवले आहेत.
स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..
“मी उड्डाण सुरू केल्यापासून आईची वाट पाहत होतो आणि शेवटी मला त्यांच्याबरोबर जयपूरला घरी परतण्याची संधी मिळाली.,” या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सनी कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरनं स्वप्न सत्यात उतरलं, वेल डन अशी कमेंट केली आहे तर आणखी एका युजरनं हे दृश्य पाहून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल
याआधीही असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यात एका महिला पायलटला तिच्या पतीनं सरप्राईज दिलं होतं. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. अलीकडेच, कॅप्टन अल्नीझचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्याने त्याची पत्नी झाहराला एक विशेष घोषणा करून आश्चर्यचकित केले होते. त्याच्या मोहक हावभावाने अनेकांची मने जिंकली आणि लाखो व्ह्यूज मिळवले.