चेहरा सुंदर दिसावा, त्वचेवर काही रिॲक्शन, एलर्जी होऊ नये म्हणून प्रत्येक मुलगी खूप काळजी घेते. कारण चेहऱ्याला काही झालं तर त्याचा मानसिक त्रासही होतो, न्युनगंड येतो. ३० मिनिटे उन्हात झोपलेल्या ब्युटीशियनला जेव्हा तिच्या कपाळावरची त्वचा पूर्णपणे सोलण्यासारखी आणि प्लास्टिकसारखी दिसली तेव्हा ती खूप घाबरली. सिरीन सुट्टीच्या दिवसात बल्गेरियाला गेली होती. २१ अंश सेल्सिअस तापमानात ती सनस्क्रीन न लावता उन्हात झोपली. (UK woman falls asleep in sun for 30 minutes, wakes up with a 'plastic' forehead) तीव्र सूर्यप्रकाशात जास्त वेळ झोपणे हानिकारक असू शकते. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जेव्हा ती महिला उन्हात झोपली त्यानंतर तिचा चेहरा प्लास्टिकसारखा झाला होता. तिचा चेहरा लाल झाला होता . या महिलेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
हे घडलं कसं?
ब्युटीशियन सिरीन मुराद बल्गेरियन बीचवर फक्त 30 मिनिटांसाठी झोपली होती. तिला जाग आली तेव्हा तिच्या कपाळाच्या स्थितीवर तिचा विश्वास बसेना. 25 वर्षीय तरुणीने तिच्या चेहऱ्यावर कोणतंही सनस्क्रीन लावलं नव्हतं अर्धा तास झोपली होती. सुरुवातीला तिला फक्त हलके दुखत होते आणि चेहरा लाल झाला होता. सनस्क्रीन न लावल्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला.
ना बीलाचं टेंशन, ना एसीची गरज; शहरातली नोकरी सोडली अन् जोडप्यानं गावी बांधलं टुमदार घर
सिरीनने अत्यंत वेदनादायक लाल चेहरा अनुभवला. एवढेच नाही तर तिची त्वचा इतकी घट्ट होती की ती प्लास्टिकसारखी दिसू लागली. तिने त्वरित कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही, फक्त तिच्या कुटुंबाशी या समस्येबद्दल बोलली. परिस्थिती बिघडायला लागल्यावर तिनं दवाखाना गाठला. तिच्या कपाळावरची त्वचा आणि डोळ्याभोवतीचा भाग गुलाबी डागांनी झाकलेला होता.