Join us  

प्लास्टिकचे युज & थ्रो कप- प्लेट्स - चमच्यांवर लवकरच बंदी; तुमच्या स्वयंपाकघरातही पर्यावरणाला घातक वस्तू आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 6:30 PM

सिंगल युज प्लास्टिक (single use plastic) ही पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरली आहे, त्यामुळेच तर आता या विषयी काही सक्त कारवाई करण्यात आली तर पुढील दोन- तीन महिन्यांत तुमच्या घरातील या काही वस्तू हद्दपार होऊ शकतात..

ठळक मुद्देया नियमाची खरोखरंच अंमलबजावणी झाल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय होऊ शकतो आणि त्याद्वारे जवळपास ४० टक्के प्लास्टिक कचरा कमी होऊ शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हानिकारक आहे, हे वारंवार सांगून झाले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आपण शक्य तेवढा कमी केला पाहिजे. कारण जे प्लास्टिक ठराविक जाडीपेक्षा पातळ असते, त्याचे विघटन होत नाही आणि ते वर्षानुवर्षे तशाच अवस्थेत राहते.. हे प्लास्टिक जनावरांच्या पोटात जाते.. अनेक जनावरांच्या पोटात कित्येक किलोचे प्लास्टिक निघाले, असे वृत्त आपण नेहमीच ऐकतो, पाहतो...

 

त्यामुळेच तर ज्या प्लास्टिकचा पुर्नवापर (reuse of plastic) करता येणार नाही, अशा प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून वारंवार करण्यात येते. पण तरीही छुप्या मार्गाने त्यांची विक्री आणि उत्पादन दोन्हीही सुरूच असते. अशा नियमात नसणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर या सर्व गोष्टी येत्या ३१ जुलैपासून सक्तीने बंद कराव्यात, त्यासाठीच्या उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था लवकरच सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने संबंधित संस्थांना दिले आहेत.. या आदेशाचे पालन झाल्यास आपल्या घरातील या काही प्लास्टिकच्या गोष्टी हद्दपार होऊ शकतात. या नियमाची खरोखरंच अंमलबजावणी झाल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय होऊ शकतो आणि त्याद्वारे जवळपास ४० टक्के प्लास्टिक कचरा (plastic waste) कमी होऊ शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकची समस्या तर खरोखरंच वाढते आहे. त्यामुळे जर प्लास्टिक बंदी केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल. पर्यायी व्यवस्था निर्माण करून याबाबत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे मत प्रा. डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

 

या वस्तूंची विक्री होऊ शकते बंद.. (plastic ban)- प्लास्टिक स्टिक असणारे इयर बड्स, फुग्याला असलेली प्लास्टिकची काडी, स्ट्रॉ, लॉलीपॉप किंवा कॅण्डीला असणारी प्लॅस्टिकची काडी, मिठाईच्या बॉक्सवर असणारे पातळ प्लास्टिकचे आवरण, थर्माकॉलच्या सजावटीच्या वस्तू, प्लास्टिकच्या प्लेट, चमचे, कप, वाट्या या सगळ्या गोष्टी यामध्ये बंद होऊ शकतात.- आपण घरात तेल, मीठ यासारख्या प्लास्टिकच्या पिशवीत असणाऱ्या वस्तू आणतो. या पिशव्यांची जाडीही आता नियमानुसार वाढवावी लागणार आहे. ज्या पिशव्यांची जाडी १२० मायक्रॉनपेक्षा कमी असणार, त्यांच्यावर बंदी येण्याची शक्यता असून आता संबंधित कंपन्यांना हे नविन नियम लक्षात घेऊनच प्लास्टिक बॅगची निर्मिती करावी लागणार आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलप्लॅस्टिक बंदी