Join us  

भारतीय रंगात रंगलेल्या इजिप्तच्या लेकीनं जिंकली मनं, पाहा तिनं गायलेलं ’देश रंगिला’ गाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 1:51 PM

PM Modi praises 'melodious' performance of Egyptian girl Kariman on 'Desh Rangeela' song : भारतीय पोषाख घालून ‘भारतीय’ रुपातल्या इजिप्तच्या लेकीचं सुमधूर गाणं, पंतप्रधानांनीही केलं कौतुक

भारताने यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताक दिनादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून देशाबद्दल असणारे प्रेम व्यक्त करण्यात आले. भारतीय लोकं विविध गोष्टी सादर करून आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतातच, पण कधी इतर देशातील व्यक्तीने भारत देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलेलं पाहिलं आहे का?

सोशल मिडीयावर अशाच एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जी भारतीय नागरिक नसूनही भारतीय पेहराव घालून 'देश रंगीला' हे सुरेख गाणं गाताना दिसत आहे (Social Viral). मुख्य म्हणजे या मुलीचे विशेष कौतुक खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट शेअर करत केली आहे(PM Modi praises 'melodious' performance of Egyptian girl Kariman on 'Desh Rangeela' song).

इजिप्शियन मुलीला भारत देशाची ओढ..

पिरॅमिडचे जग म्हणून ओळख असणाऱ्या देशात विविध गोष्टी पाहायला मिळतात. तेथील संस्कृती विलक्षण आणि नेत्रदीपक आहे. पण इजिप्शियन मुलीला भारत देशाबद्दल विशेष कौतुक आणि प्रेम आहे.

बाबाही बनेल मुलांचा जीवाभावाचा दोस्त! करा स्वत:त ४ सोपे बदल-बापलेकरांचं नातं होईल घट्ट

जसा देश तसा वेश

परंपरागत भारतीय घागरा घालून इजिप्शियन गर्ल, अर्थात करीमन हिने फना चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं 'देश रंगीला' हे गाणं सुरेख गाणं गायलं आहे.  इंडियन एम्बेसीने या मुलीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये मुलीचे विशेष कौतुक केलं आहे. इंडियन एम्बेसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इजिप्शियन तरुणी करिमनने 'इंडिया हाऊस' येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात "देश रंगीला" हे देशभक्तीपर गाणे सादर केले. तिच्या मधुर गायनाने सर्वजण प्रभावित झाले आहे.'

विशेष म्हणजे या व्हिडिओची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की,'इजिप्तमधील करिमनचे हे सादरीकरण मधुर आहे! या प्रयत्नासाठी मी तिचे अभिनंदन करतो आणि तिच्या भविष्यासाठी तिला शुभेच्छाही देतो.'

अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

२०२३ साली जून महिन्यात जेव्हा पंतप्रधान कैरोला गेले होते, तेव्हा एका इजिप्शियन मुलीने त्यांच्यासाठी 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणे गायले होते. त्यावेळी देखील पंतप्रधानांनी मुलीचे तोंडभरून कौतुक केले होते.

टॅग्स :नरेंद्र मोदीसोशल व्हायरलसोशल मीडिया