Lokmat Sakhi >Social Viral > 'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

मिलेट्सचे महत्व सांगणारा हा व्हिडिओ, स्थानिक आहार पद्धतीतले त्याचे स्थानही अधोरेखीत करतो. पंतप्रधानांनीही हा व्हिडिओ रिशेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:27 PM2023-04-17T17:27:51+5:302023-04-17T18:03:15+5:30

मिलेट्सचे महत्व सांगणारा हा व्हिडिओ, स्थानिक आहार पद्धतीतले त्याचे स्थानही अधोरेखीत करतो. पंतप्रधानांनीही हा व्हिडिओ रिशेअर केला आहे.

PM Modi shares video of lady shopkeeper in arunachal pradesh highlighting benefits of shree anna | 'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

मिलेट्स. भरड धान्य हे स्थानिक आहारात फार महत्त्वाचे आहे. भरड वर्षही आपण साजरे करत आहोत. आहारात मिलेट्सचे प्रमाण वाढावे म्हणून सरकारही प्रचार प्रसार करत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करतानाचा अरुणाचल प्रदेशातील महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ती महिला मिलेट्सचे महत्व सांगते आहे. ते खाल्ल्याने माणसं आजारीही पडत नाही असं अतिशय आत्मविश्वासाने सांगणारी ही महिला लोकल आहाराचे महत्वच अधोरेखीत करते आहे. पंतप्रधानांनीही तो व्हिडिओ शेअर केला आहे. कमी पाण्यात, स्थानिक आहाराचा भाग म्हणून मिलेट्सचे मोठे महत्व आहे.((PM Modi shares video of lady shopkeeper in arunachal pradesh highlighting benefits of shree anna)

दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी नागालँडमधील तुएनसांग येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले. नागालँड विधानसभेचे सदस्य जेकब झिमोमी यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण देशभरात स्वच्छतेसाठी प्रचंड ऊर्जा दिसून आली आहे, ज्यामुळे आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासह विविध क्षेत्रांमध्ये फायदे झाले आहेत.

मिलेट्स म्हणजे काय? 

भरडयुक्त धान्याला मिलेट्स म्हणतात. बऱ्याच लोकांना मिलेट्सच्या सेवनाचे फायदे माहित नसल्यानं ते रोजच्या जेवणात याचं सेवन करत नाहीत. ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू, भगर यांसारख्या धान्यांना एकत्रितरित्या मिलेट्स बाजरी म्हणतात. त्यांचे सेवन केल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते, पचनक्रिया  चांगली  राहते परिणामी आजारी पडण्याची शक्यताही कमी होते. 
मिलेट्समध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, एन्झाइम्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात.

इतकेच नाही तर मायक्रो उत्कृष्ट पोषक घटक देखील यामध्ये असतात.  बीटा-कॅरोटीन, नियासिन, व्हिटॅमिन-बी6, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, ग्नेशियम यांसारखे पोषक घटकही यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.मिलेट्सच्या सेवनानं शरीर निरोगी राहते. मिलेट्स इतर धान्यांपेक्षा स्वस्त असून अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ते आजही भारतातील खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये खाल्ले जातात. हे स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत, परंतु आता त्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात ते खूप महाग झाले आहेत.

मिलेट्सच्या सेवनाने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. हे खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते खाणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, हृदयविकार, पचनाच्या समस्या कमी होतात. यासोबतच मधुमेहाविरुद्ध लढण्यातही मदत करतात. ही धान्य शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात  हाडे मजबूत करतात आणि हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतात.
 

Web Title: PM Modi shares video of lady shopkeeper in arunachal pradesh highlighting benefits of shree anna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.