महिलांना आवडणारा दागिना म्हणजे सोनं. सोन्याच्या दागिन्यांमुळे महिलांच्या अंगावर लखलखतं तेज उठून दिसते. कपडे, मेकअप, याशिवाय दागिन्यांची शौकीन महिला असतात. सोन्याचा भाव कितीही चढता असला तरी, महिलावर्ग सोनं घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. सणाच्या दिवशी हमखास महिला सोनं घालून मिरवतात.
काही महिलांकडे आपल्या आजी, पणजीचे दागिने असतात. जे कालांतराने काळपट पडतात, त्यामधील तेज कमी होते. दागिने काळपट पडल्यावर आपण पॉलिश करण्यासाठी सराफाकडे देतो. काहीवेळेला आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे, आपण सराफाकडे जाऊन दागिने पॉलिश करण्यासाठी देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत घरच्या घरी सोनं साफ करण्याची पद्धत पाहा. या ट्रिक्समुळे सोन्याच्या दागिन्यांची सफाई सहज करता येईल(4 Ways to Clean Gold Ornaments).
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टिप्स
गरम पाण्याचा करा असा वापर
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी, एका भांड्यात गरम पाणी ठेवा. आता त्यात सौम्य साबण घालून मिश्रण तयार करा. त्या मिश्रणात दागिने सुमारे २० मिनिटांसाठी ठेवा. असे केल्याने दागिने स्वच्छ होतील, व काळपटपणा निघून जाईल.
चांदीचे पैंजण - दागिने काळपट पडले? एक भन्नाट ट्रिक, हात न लावता, न घासता, १५ मिनटात चकाचक
डिशवॉशिंग लिक्विडने साफ करा दागिने
दागिने चमकण्यासाठी आपण सौम्य डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यात डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विड घालून मिश्रण तयार करा. या मिश्रणात दागिने भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशने साफ करा. दागिन्यांमधील घाण लगेच निघून जाईल.
सोड्याने करा ज्वेलरी साफ
बेकिंग सोड्याचा वापर आपण दागिने चमकवण्यासाठी करू शकतो. यासाठी गरम पाण्यात सोडा मिसळा, मग त्यात दागिने सुमारे २० मिनिटे ठेवा. काही वेळानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.
गाद्या फार कळकट-घाणेरड्या दिसतात, डाग पडलेत? ५ उपाय- गाद्याही होतील स्वच्छ
लिंबू चमकवेल दागिने
एका भांड्यात गरम पाणी घ्या, त्या गरम पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. त्यानंतर त्यात दागिने घालून सुमारे २० मिनिटे ठेवा. असे केल्याने दागिन्यांमधील काळपटपणा निघून जाईल.