(Image Credit-Social Media)
मुंबई क्रूझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise Drugs Case) प्रकरणी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक झाल्यानंतर शाहरूखची मॅनेजर पूजा दादलानी (Pooja Dadlani) ही खूप चर्चेत होती. बॉलीवूड सुपरस्टारची मॅनेजर पूजा ददलानी आर्यन आणि खान कुटुंबात मध्यस्थ म्हणून काम करत आहे.
शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी फारसे सार्वजनिक ठिकाणी आलेले नाहीत. 2012 पासून सुपरस्टारची मॅनेजर असलेली पूजा अनेकवेळा पाहिली गेली आणि 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनाच्या सुनावणीवेळी ती कोर्टात हजर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा ती भावूकही झाली होती.
कोण आहे पूजा दादलानी
9 वर्षे सुपरस्टारची मॅनेजर असलेली पूजा, मुंबईतील अभिनेत्याच्या घरी मन्नत येथे आयोजित केलेल्या इवेंट्स, कार्यक्रमांमध्ये दिसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा शाहरुखचे ब्रँड एंडोर्समेंट्स, त्याची क्रिकेट टीम कोलकाता नाइट रायडर्स आणि इतर बिझनेस-संबंधित एंगेजमेंट्स देखील ती हाताळते. तिच्याकडे अंदाजे 45 कोटी रुपयांची संपत्ती आहे, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
पूजाची लाइफस्टाइल कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पूजाचं घर, तिची संपत्ती ही एकंदरीत सेलिब्रिटींसारखीच आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो ती सातत्याने शेअर करत असते. पूजाला एक लहान मुलगी असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांसोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
पूजा चर्चेत का आहे?
ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची मागणी केली होती. असा गौप्यस्फोट साईल नावाच्या साक्षीदाराने केला होता. पूजा दादलानी साईलने सांगितल्याप्रमाणे किरण गोसावी आणि सॅम डिसूझाला भेटण्यासाठी त्या रात्री गेली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे या तिघांची भेट झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुसऱ्या समन्सची मुदत संपली तरी पूजा चौकशीला आली नाही. जबाब न नोंदविल्यामुळे समीर वानखेडेंच्या खंडणी प्रकरणाची चौकशी करता येत नाहीये.