Join us  

नाकावर ११ लाख, ब्रेस्ट सर्जरीवर ९ लाख खर्च! पॉर्नस्टार मिया खलिफा, सब दिखावा है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 3:01 PM

Social viral: पॉर्न स्टार मिया खलिफा (Porn star Mia Khalifa) ही नेहमीच तिच्या बोल्ड, हॉट अवतारामुळे चर्चेत असते.. आता मात्र तिच्या या बोल्ड दिसण्यामागचे नेमके रहस्यच तिने खुले केले आहे...

ठळक मुद्देमिया खलिफाने मागच्याच वर्षी तिच्या नाकाचे ऑपरेशन केले हाेते

प्रसिद्ध पॉर्न स्टार मिया खलिफा म्हणजे जणू काही सोशल मिडियावरचं एक हॉट (hot and bold look of Mia Khalifa) वादळ.... तिचे कपडे, तिची स्टाईल, तिची फिगर या गोष्टींबाबत सोशल मिडियावर (social media) नेहमीच काही ना काही किस्से रंगलेले असतात.. आता मात्र ती भलत्याच गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. चर्चा सुरू आहे ती तिच्या ब्रेस्ट सर्जरीची आणि नाकाची... तिच्या नाकाचे ऑपरेशन झाले आहे. एवढेच नाही तर तिचे ब्रेस्ट देखील इम्प्लांट केलेले आहेत, हे तिने स्वत:च एका व्हिडियोद्वारे सांगितले आहे. 

 

सोशल मिडियावर मिया खलिफा चांगलीच ॲक्टीव्ह असते.. नुकताच तिने तिचा एक व्हिडियो (trending video of Mia Khalifa) सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती आणि तिची काल्पनिक मुलगी दोघी एकमेकांशी संवाद साधत आहेत, असं दिसतंय.. मिया आणि तिची मुलगी अशा दोन्ही भूमिका मियाच करते आहे.

 

तर या व्हिडियोत मियाची काल्पनिक मुलगी तिला विचारते की मी मोठी झाल्यावर माझ्या आईसारखीच दिसणार आहे.. यावर मिया तिला म्हणते की असं दिसण्यासाठी आईने तिच्या ब्रेस्टवर तब्बल १३ हजार डॉलर्स म्हणजे जवळपास ९ लाख तर नाकावर १५ हजार डॉलर्स म्हणजे जवळपास ११ लाख रूपये खर्च केले आहेत. त्यामुळे तुला आईसारखं दिसायचं असेल तर आतापासूनच पैशांची बचत करायला सुरूवात कर.. 

 

मिया खलिफाने मागच्याच वर्षी तिच्या नाकाचे ऑपरेशन (nose surgery) केले हाेते. मात्र त्यासाठी आणि ब्रेस्ट सर्जरीसाठी (breast surgery) तिला एवढी मोठी रक्कम मोजावी लागली होती, हे मात्र तिच्या चाहत्यांना आतापर्यंत ठाऊक नव्हते.. २००१ साली मिया तिच्या कुटूंबियांसोबत अमेरिकेला वास्तव्यास गेली होती.

 

तेव्हा ती फ्लोरिडाच्या एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करायची. तेथेच भेटलेल्या एका व्यक्तीकडून तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आणि त्यानंतर तिचा पॉर्नस्टार (porn star) होण्याचा प्रवास सुरू झाला.  २०१५ साली तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणे सोडून दिले होते..  

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया