Join us  

Potato Makeup Video: केला बटाट्याने मेकअप, तयार झाला सुंदर चेहरा; बघा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 3:50 PM

Social Viral: थोडासा मेकअप केला तर बटाटाही किती देखणा (potato makeup) दिसू शकतो, हे एकदा बघाच..

ठळक मुद्देओबडधोबड खडबडीत बटाटाही किती कमाल दिसू शकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालेला हा देखण्या बटाट्याचा व्हिडिओ एकदा बघाच...

जड- अवजड, ओबड- धोबड अशा विशेषणांसाठी बटाट्याची उपमा दिली जाते.. बटाट्याची भाजी आवडीने खाणारे अनेक असतात. पण बटाटा दिसायला आवडतो असं म्हणणारं कुणीच नसतं.. आता हिरवीगार लांबुळकी मिरची, लालबुंद टोमॅटो, रसरशीत गाजरं बघितली की लगेच खावीशी वाटतात..पण असं टेम्प्टेशन बटाट्याच्या बाबतीत मात्र कधीच होत नाही.. असा हा ओबडधोबड खडबडीत बटाटाही किती कमाल दिसू शकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालेला हा देखण्या बटाट्याचा व्हिडिओ एकदा बघाच...

 

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका मेकअप आर्टिस्टने मेकअप करून दाखवला आहे.. आणि तो ही चक्क एका बटाट्यावर..  मेकअप करताना आर्टिस्टने जणू त्या बटाट्यावर जादू केली आहे.. प्रशिक्षित मेकअप आर्टिस्टकडून जर मेकअप करून घेतला तर माणसाचेच नाही, पण बटाट्याचेही रुप कसे पालटू शकते आणि तो लाखात एक देखणा दिसू शकतो, हे हा व्हिडिओ पाहून नक्कीच जाणवेल. 

 

बटाट्याच्या मेकअपचा हा सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्रामच्याbeautyblizz0 या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स आणि कॉस्मेटिक्स लावून बटाट्यावर एका मुलीचा सुंदर चेहरा रेखाटण्यात आला आहे.. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर हे काम एखाद्या बटाट्यावर करण्यात आलं आहे, हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही, इतका हा मेकअप परफेक्ट जमून आला आहे. सुरुवातीला बटाटा स्वच्छ धुवून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५ ते ६ क्रिम लावण्यात आले. त्यानंतर फाउंडेशन, कॉम्पॅक्ट लावून बटाट्यावर नाक, डोळे, ओठ रेखाटण्यात आले आणि बघता बघता बटाट्यातून एका सुंदर चेहऱ्याने जन्म घेतला.. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला जवळपास ५० हजार लाईक्स मिळाले आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामब्यूटी टिप्समेकअप टिप्स