Lokmat Sakhi >Social Viral > आजीबाईची पोटली नव्हे...'पोटली मसाज', या मसाजमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव होईल दूर...

आजीबाईची पोटली नव्हे...'पोटली मसाज', या मसाजमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव होईल दूर...

Potli Massage Therapy Benefits : सध्या 'पोटली मसाज' हा मसाजचा एक नवीन प्रकार खूप ट्रेंडिंग होत आहे. नेमक काय आहे हा 'पोटली मसाज'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 07:46 PM2023-02-11T19:46:01+5:302023-02-11T19:47:18+5:30

Potli Massage Therapy Benefits : सध्या 'पोटली मसाज' हा मसाजचा एक नवीन प्रकार खूप ट्रेंडिंग होत आहे. नेमक काय आहे हा 'पोटली मसाज'...

'potli massage', this massage will remove physical and mental stress... | आजीबाईची पोटली नव्हे...'पोटली मसाज', या मसाजमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव होईल दूर...

आजीबाईची पोटली नव्हे...'पोटली मसाज', या मसाजमुळे शारीरिक आणि मानसिक तणाव होईल दूर...

सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपल्याला आराम करायला तसा फारसा वेळ मिळत नाही. या धावपळीत आपले शरीर, मन, मेंदू एकूणच आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टया थकलेलो असतो. हा थकवा दूर करण्यासाठी आपल्याला कधी कधी तासंतास झोपावेसे वाटते, कधी सगळी काम बाजूला ठेवून शांत बसावेसे वाटते. दिवसभराच्या धावपळीमध्ये अनेकांना शारीरिक थकवा व मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शारीरिक तसंच मानसिक थकवा दूर करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे बॉडी मसाज.

आयुर्वेदामध्येही मसाज उपचार पद्धतींना भरपूर महत्त्व आहे. केवळ आपल्याच देशात नव्हे तर परदेशांमध्येही वेगवेगळ्या उपचारांनुसार मसाज थेरपी दिली जाते. या उपचार पद्धतींमध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक- नैसर्गिक तेलांची मदत घेण्यात येते. आवश्यकतेनुसार शरीराच्या काही अवयवांचा किंवा संपूर्ण शरीराचाही मसाज केला जातो. बदलत्या काळानुसार मसाज उपचारांमध्ये देखील खूप बदल झालेले आहेत. आयुर्वेदिक मसाज, थाय मसाज यांसारखे वेगळेवेगळे मसाज केले जातात सध्या 'पोटली मसाज' हा मसाजचा एक नवीन प्रकार खूप ट्रेंडिंग होत आहे(Potli Massage Therapy Benefits).

पोटली मसाज थेरेपी म्हणजे नेमकं काय ? 
पोटली मसाज एक आयुर्वेदिक मसाज आहे. या मसाजमुळे तुमच्या शरीराशी आणि त्वचेशी संबंधित सर्व प्रकारचे आजार दूर होतात. एक छान आणि आरामदायी पूर्ण शरीर मसाज केल्याचा अनुभव या पोटली मसाज थेरेपीमुळे येतो. पोटली मसाज ही एक प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. प्राचीन काळी लोक अनेक नैसर्गिक मार्गांनी मसाज करत असत, पोटली मसाज त्यापैकी एक मानली जाते. पोटली मसाज, योग्य प्रकारे केल्यास जवळजवळ सर्व प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. एवढेच नाही तर या मसाज थेरपीच्या मदतीने आपण आपले वाढते वजनही नियंत्रित करू शकतो. यामुळे हाड आणि मणक्याच्या समस्यादेखील दूर होतात. भारतासह दक्षिणपूर्व आशिया आणि थायलंडमध्ये शतकानुशतके नैसर्गिक उपचार, मसाज म्हणून पोटली मसाज थेरेपीचा वापर केला जात आहे.  


पोटली मसाज थेरेपीमध्ये नेमकं काय करतात ?
पोटली मसाज थेरेपी ही वेदना, ताण - तणाव कमी करण्यासाठीची एक आयुर्वेदिक कृती आहे. पोटली मसाज थेरेपीमध्ये, एका विशिष्ट्य पोटलीच्या आकाराच्या दिसणाऱ्या हर्बल पाऊचचा वापर केला जातो. आयुर्वेदिक तेल जसे की तीळ, खोबरेल तेल यांसारख्या तेलामध्ये काही निवडक औषधी वनस्पती घालून त्या तेलात उकळविल्या जातात. त्यानंतर या औषधी वनस्पती एका पोटलीमध्ये बांधून त्या पोटलीने मसाज केला जातो. जेव्हा ही औषधी गरम तेलाची पोटली आपल्या शरीरावर ठेवली जाते तेव्हा शारीरिक दुखण्यापासून आणि ताण - तणावांपासून मुक्ती मिळून आपल्याला फ्रेश, ताजेतवाने वाटते. पोटली मसाज थेरेपीचे एक सेशन १५ ते २० मिनिटांचे असते.

पोटली मसाज थेरेपीचे फायदे :- 

१. पोटली मसाज नियमित केल्याने सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे या समस्या कमी होतात. ही पोटली तुमचे रक्ताभिसरण सुधारू शकते.
२. जर आपल्याला वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर पोटली मसाजचा वापर करावा. 
३. पोटली मसाजने नियमित मसाज केल्यास तणाव, नैराश्य आणि निद्रानाशाच्या तक्रारी दूर होतात.

   
४. पोटातील गॅस, ब्लोटिंग आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी पोटली मसाजचा वापर केला जाऊ शकतो.
५. पोटली मसाजमुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते आणि सर्व अवयवांमध्ये रक्ताचा प्रवाह सुद्धा वाढतो. तसंच डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.

शारीरिक समस्येनुसार विविध प्रकारचे पोटली मसाज केले जातात... 

१. राईस पोटली - राईस पोटलीमध्ये, तांदूळ आणि रोजमेरीच्या झाडांच्या पानांचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक पोटलीमध्ये भरून पोटली गरम केली जाते. आणि या गरम झालेल्या पोटलीने शरीरावर हलक्या हाताने मसाज केला जातो. या प्रकारच्या मसाजमुळे शरीरातील मांसपेशींना बळकटी मिळण्याचे कार्य केले जाते. 

२. सैंधव मिठाची पोटली -  सैंधव मिठाच्या पोटलीमध्ये, सैंधव मीठ, ओवा, मेथीचे दाणे, लसूण हे तेलात घालून उकळविले जाते. आणि मग हे सगळे घटक पोटलीमध्ये बांधून त्यापासून मसाज केला जातो. यामुळे शरीरातील जुने दुखणे आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. 

३. पावडर पोटली - या पावडर पोटलीमध्ये, मोहरी, अश्वगंधा, कडुनिंबाची पाने, हळद. मेहेंदी, आले यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींची पावडर मिसळली जाते. या पोटलीने मसाज केल्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर केल्या जातात.

Web Title: 'potli massage', this massage will remove physical and mental stress...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.