Join us  

Power of government job : सरकारी नोकरीची पॉवर! आधी चेहरा पाहून नकार दिला अन् आता त्याच मुलासोबत लग्नाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 3:31 PM

Power of government job : सरकारी नोकरी मिळवली आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने त्याला हो म्हटले. मुलगी पुढे म्हणते, 'सरकारी नोकरीमुळे मी आज त्याची पत्नी आहे.

सरकारी नोकऱ्यांची क्रेझ आपल्या देशात खूप पाहायला मिळते. वास्तविक, सरकारी नोकरीत नोकरीची सुरक्षा असते. लहानपणापासूनच प्रत्येक मूल सरकारी नोकरीचे स्वप्न पाहू लागते. कुटुंबातील सदस्यही आपल्या मुलांना सरकारी नोकरीसाठी प्रवृत्त करतात, त्यामुळेच मुल खूप कष्ट करतात. मात्र, बहुतांश लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळेही देशात सरकारी नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. ( Power of government job girl refused seeing the face then married the same boy)

दुसरीकडे प्रत्येक पालकालाही आपल्या मुलीचे लग्न सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी करायचे असते. बहुतेक पालक सरकारी नोकराला जावई म्हणून प्राधान्य देतात. सोशल मीडियावर आम्हाला यासंबंधीचा एक व्हिडिओ सापडला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये एक मुलगी सांगते की, यापूर्वी तिने पतीचा चेहरा पाहून नकार दिला होता. मात्र, नंतर त्या मुलाला सरकारी नोकरी लागली. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी लग्न केले.

बाबौ! हजारो फूट उंचावर कपल्सचा रोमॅन्टिक अंदाज; हवेत साजरा केला Kiss Day, पाहा  व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये पत्नी आणि तिचा पती दिसत आहेत. पत्नी पतीच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि म्हणते की, यापूर्वी मी त्याचा चेहरा पाहून लग्न करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्याने सरकारी नोकरी मिळवली आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने त्याला हो म्हटले. मुलगी पुढे म्हणते, 'सरकारी नोकरीमुळे मी आज त्याची पत्नी आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल