Join us  

चेहऱ्यावर दाढीमिशा म्हणून ट्रोल झालेल्या प्राची निगमचा सल्ला, मुलींनो जे बिघडलेलेच नाही ते दुरुस्त का करता?

By रुचिका पालोदकर | Published: May 29, 2024 11:51 AM

Prachi Nigam's Special Message To Women: चेहऱ्यावर असलेल्या अतिरिक्त केसांमुळे ट्रोल झालेली प्राची निगम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिने सांगितलेल्या एका खास गोष्टीमुळे... 

ठळक मुद्देखूप अर्थपूर्ण असणारा हा मेसेज प्रत्येकीलाच कधी ना कधी मानसिक आधार, बळ देणारा आहे.. 

ऋचिका सुदामे- पालोदकर 

रंग, रूप, उंची हे काही आपल्या हातात नसतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीही एखाद्या व्यक्तीला तिच्या रंगावरुन, दिसण्यावरून ट्रोल करणं काही कमी होत नाही. तू मुलगी आहे म्हणून असंच दिसलं पाहिजेस, तू मुलगा आहेस त्यामुळे तुला तसंच वागलं पाहिजे, हे खूप दबावपुर्वक प्रत्येकाच्याच मनात रुजवलं गेलं आहे. त्यामुळेच तर प्राचीच्या परीक्षेतील गुणांपेक्षाही, ती १० वी परीक्षेत टॉपर ठरली यापेक्षाही तिच्या दिसण्याचीच चर्चा जास्त झाली. याचं कारण म्हणजे तिच्या चेहऱ्यावर असणारे अतिरिक्त केस. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्यासारखंच ट्रोलिंग इतर महिलांनाही कधी ना कधी सहन करावंच लागतं. म्हणूनच अशा महिलांसाठी प्राचीने एक खास गोष्ट सांगितली आहे. (Prachi Nigam's Special Message To Women)

 

प्राची जी खास गोष्ट सांगतेय ती जर प्रत्येकीने लक्षात ठेवली तर कोणी कितीही टोमणे मारले, दिसण्यावरून कितीही बोल सुनावले तरी तुम्हाला त्रास होणार नाही.

फक्त २ पदार्थ चेहऱ्यावर चोळा- अदिती राव हैदरी सांगतेय ग्लोईंग त्वचेसाठी साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स 

प्राचीचा एक इन्स्टाग्राम व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. anishbhagatt या पेजवरून तो शेअर करण्यात आला असून यामध्ये ती एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सरसोबत दिसते आहे. सुरुवातीला त्या इन्फ्लूएन्सरने तिला मस्कार, नेलपेंट आणि थोडे इतर कॉस्मेटिक्स लावून तिचा मेकअप केला आणि त्यानंतर ती कॅमेऱ्यासमोर आली. मेकअप केला तरीही तिचं खरं रंग- रुप बदलून किंवा लपवून टाकण्यात आलेलं नव्हतं हे विशेष.

 

कॅमेऱ्यासमोर येऊन प्राचीने "Don't try to fix something that was never broken" असा संदेश महिलांना दिला आहे. आपण आपल्या जागी बरोबरच असतो. चांगल्याच दिसत असतो.

हरबऱ्यांना लगेच भुंगा लागतो- वाया जातात? ४ सोपे उपाय, महिनोंमहिने हरबऱ्यांना किड लागणार नाही 

पण तरीही दुसऱ्या कुणाला वाटतं म्हणून स्वत:मध्ये बदल करतो, दुसऱ्यांच्या नजरेला चांगलं वाटावं म्हणून स्वत:ला बदलतो. हे बदल करताना आपल्यात काहीतरी कमी आहे, ही जाणीव बहुसंख्य जणींच्या मनात असते. तीच कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न प्राचीने या मेसेजमधून केला आहे. खूप अर्थपूर्ण असणारा हा मेसेज प्रत्येकीलाच कधी ना कधी मानसिक आधार, बळ देणारा आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्राममहिला