Lokmat Sakhi >Social Viral > नेल पेण्ट रिमूव्हरने करा घरातल्या स्वच्छतेची कामं... वैताग देणाऱ्या गोष्टी होतील सहज सोप्या 

नेल पेण्ट रिमूव्हरने करा घरातल्या स्वच्छतेची कामं... वैताग देणाऱ्या गोष्टी होतील सहज सोप्या 

नेल पेण्ट रिमूव्हरचा ( nail paint remover) उपयोग केवळ नखांवरची नेल पेण्ट काढण्यासाठीच होतो असं नाही. घरातल्या टाइल्सपासून इलेक्ट्राॅनिक गॅजेटपर्यंतची स्वच्छता नेल पेण्ट रिमूव्हरनं (uses of nail paint remover) सहज करता येते. ती कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 10:05 AM2022-08-06T10:05:29+5:302022-08-06T10:10:01+5:30

नेल पेण्ट रिमूव्हरचा ( nail paint remover) उपयोग केवळ नखांवरची नेल पेण्ट काढण्यासाठीच होतो असं नाही. घरातल्या टाइल्सपासून इलेक्ट्राॅनिक गॅजेटपर्यंतची स्वच्छता नेल पेण्ट रिमूव्हरनं (uses of nail paint remover) सहज करता येते. ती कशी?

Practical uses of nail paint remover | नेल पेण्ट रिमूव्हरने करा घरातल्या स्वच्छतेची कामं... वैताग देणाऱ्या गोष्टी होतील सहज सोप्या 

नेल पेण्ट रिमूव्हरने करा घरातल्या स्वच्छतेची कामं... वैताग देणाऱ्या गोष्टी होतील सहज सोप्या 

Highlightsनेल पेण्ट रिमूव्हरने टाइल्सपडलेले डाग निघून जातात.कपड्यांवर पडलेले चहा काॅफीचे डाग निघत नसतील तर ते नेल पेण्ट रिमूव्हरनं जातील.इलेक्ट्राॅनिक वस्तू नेल पेण्ट रिमूव्हरनं झटक्यात स्वच्छ होतात. 

हाता पायाच्या बोटांना लावलेली नेल पेण्ट काढून टाकण्यासाठी नेल पेण्ट रिमूव्हरचा (nail paint remover  उपयोग होतो. पण नेल पेण्ट रिमूव्हरचा फक्त हाच आणि एवढाच उपयोग नाही. स्वच्छतेशी निगडित अनेक वैताग आणणाऱ्या गोष्टी नेल पेण्ट रिमूव्हरच्या सहाय्यानं स्वच्छ करता येतात. घरातल्या टाइल्सपासून इलेक्ट्राॅनिक गॅजेटपर्यंतची स्वच्छता     (cleaning hacks of nail paint remover) नेल पेण्ट रिमूव्हरनं सहज करता येते. जे डाग घालवण्यासाठी घाम गाळूनही काहीही उपयोग झाला नाही ते डाग घालवण्यासाठी नेल पेण्ट रिमूव्हर वापरुन पाहायलाच हवं असे याचे उपयोग आहेत. 

Image: Google

नेलपेण्ट रिमूव्हर आणि घरातली स्वच्छता

1. घरातल्या टाइल्स वर कधी कधी असे डाग पडतात ते नाना उपाय आणि खूप प्रयत्न करुनही निघत नाहीत ते काढण्यासाठी नेल पेण्ट रिमूव्हरचा उपयोग होतो. यासाठी टाइल्सवर जिथे डाग पडला आहे तिथे थोडं पाणी टाकावं. थोडावेळ ते तस्ंच राहू द्यावं. नंतर ती जागा कपड्यानं पुसून घ्यावी. त्या जागेवर नेल पेण्ट रिमूव्हर टाकून 5 मिनिटं ठेवावं. 5 मिनिटानंतर फरशी घासायचा ब्रश फिरवला की डाग सहज निघून जातो. 

Image: Google

2. कपड्यांवर डाग पडणं ही नेहेमीचीच बाब. पण चहा, लोणच्याचं तेल यांचे डाग जर कपड्यावर पडले तर ते निघता निघत नाही. असे चिवट डाग काढण्यासाठी नेल पेण्ट रिमूव्हरचा उपयोग होतो. यासाठी कपड्यांवर जिथे डाग लागला आहे तिथे नेल पेण्ट रिमूव्हर टाकून थोडा वेळ थांबावं. मग कपडे धुवायच्या ब्रशनं कपडा घासला की डाग निघून जातो. 

3. परमनण्ट मार्करनं जर कशावर लिहिलं तर ते कशान्ंही पुसलं जात नाही. पण नेल पेण्ट रिमूव्हरचा उपयोग केल्यास परमनण्ट मार्करचा डागही सहज निघून जातो. यासाठी जिथे परमनण्ट मार्करनं लिहिलं आहे (फर्निचर, टाइल्स, फरशी, प्लास्टिकच्या वस्तू) तिथे नेल पेण्ट रिमूव्हरचे 4-5 थेंब टाकावेत. 5 मिनिटानंतर कपड्याच्या सहाय्यानं घासून पुसल्यास परमनण्ट मार्करचे डाग निघून जातात. 

Image: Google

4. नेल पेण्ट रिमूव्हरनं इलेक्ट्रानिक्स वस्तू जसे लॅपटाॅप, कम्प्युटर, टीव्ही स्क्रीन, घड्याळ  या वस्तू नेल पेण्ट रिमूव्हरने सहज चकाचक करता येतात. यासाठी कापसाच्या बोळ्यावर नेल पेण्ट रिमूव्हर घ्यावं आणि त्याने इलेक्ट्राॅनिक वस्तू स्वच्छ पुसून काढाव्यात. चिनी मातीच्या भांड्याना पिवळेपणा आल्यास, डाग लागल्यास नेल पेण्ट रिमूव्हरने ते स्वच्छ करता येतात. 

Web Title: Practical uses of nail paint remover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.