लोकप्रिय युट्युबर प्राजक्ता कोळीने (Prajakta Koli) तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत (Vrishank Khanal) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. हे जोडपे गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर ते विवाहबद्ध झाले आहेत. प्राजक्ताने विविध सोशल माध्यमांतून तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण दिसत आहेत. कर्जतमधील ओलिअँडर फार्म्समध्ये हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात (discussion of the green garland at prajakta wedding what is its connection with nepali culture) झाला. मेहंदी, हळदी समारंभ, संगीत नाईट यांसारख्या अनेक धार्मिक विधीनंतर नंतर या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. लग्नात (Prajakta Koli Turns Nepali Bride For Her Reception In Bright Red Saree & Tilhari) प्राजक्ता व वृशांक फारच सुंदर दिसत होते. लग्नात दोघांचे कुटुंबीय व जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मेंदीपासून लग्नापर्यंत तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. प्राजक्ताने तिच्या लग्नसोहळ्यात नेपाळी संस्कृतीचे पारंपरिक दागिने परिधान केले होते(Prajakta Koli Turns Nepali Bride For Her Reception In Bright Red Saree & Tilhari )
प्राजक्ता आणि वृशांक यांनी त्यांच्या पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंपैकी एका लूकची चर्चा होत आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीवर गळ्यात हिरव्या रंगाचा मोठा हार परिधान केल्याचे दिसत आहे. या अलंकाराबाबत सर्वांनाच उत्सुकता वाटत आहे. हा अलंकार नेपाळी संस्कृतीचा भाग आहे. प्राजक्ताने गळ्यात घातलेल्या या नेपाळी दागिन्याची खासियत नेमकी काय आहे ते पाहूयात.
गळ्यात शोभून दिसणारा नेपाळी दागिना...
प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा होतेय ती तिने गळ्यात घातलेल्या सुंदर नेपाळी पारंपरिक दागिन्यांमुळे. प्राजक्ताने रिसेप्शपसाठी पारंपारिक नेपाळी हॅन्डवर्क असलेली आणि सोनेरी रेशमी हातमागाची साडी लाल रंगाची साडी नेसली होती. पण खरी चर्चा तर तिने गळ्यात घातलेल्या दागिन्यांची होतेय. तिने गळ्यात घातलेला मोठा हिरवा हार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
बबलगम फक्त खाऊ नका, चेहऱ्यालाही लावा! पाहा बबलगम फेसमास्कचा नवा ट्रेंड-तरुणी झाल्या क्रेझी...
टाचांवरील डेड स्किन 'या' छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी, टाचा दिसतील सुंदर व आकर्षक...
तिने गळ्यात घातलेल्या या मोठ्या लांबलचक दागिन्याला 'तिलहारी' असे म्हटले जाते. नेपाळी संस्कृतीत 'तिलहारी' हार हा मंगळसूत्रासारखाच एक महत्वाचा दागिना असतो. तो नेपाळमधील स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचे प्रतीक आहे. तो पोटे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मण्यांपासून बनवला जातो. खाली एक दंडगोलाकार सोन्याचा लटकन आहे ज्याला तिल्हारी म्हणतात. हाराचे दोन्ही भाग वेगळे आणले जातात आणि नंतर ते एकत्र केले जातात. वधूंनी तिल्हारी घालणे पवित्र आणि शुभ मानले जाते. लग्नसोहळ्यात वर आपल्या वधूच्या गळ्यात 'तिल्हारी' मंगळसूत्र म्हणून घालतो.
लग्नसोहळ्यामध्ये वर वधूच्या गळ्यात 'तिलहारी’ घालतो. ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि ते आपल्या पतीचे आयुष्य वाढवते, असा नेपाळी महिलांचा विश्वास आहे. नेपाळी महिला विवाहित असल्याचे पारंपरिक प्रतीक म्हणून ‘तिल्हारी’ घालतात. विवाहित महिला पूजा, लग्न समारंभ आणि तिहार यांसारख्या पारंपरिक सणांच्या वेळी आणि विशेषतः ‘तीज’ला हा अलंकार घालतात. 'तिलहारी' ही हिंदू विवाहित महिलेला तिच्या पतीकडून मिळालेली एक मौल्यवान भेट असते.
'तिलहारी' खूप वेगवेगळ्या डिझाइनमध्ये आणि वेगवेगळ्या आकारांत पाहायला मिळते. जसे की महिला तिरक्या पद्धतीने गळ्यात तिल्हारी घालू शकतात. खूप लांब अशा ‘ 'तिलहारी’ला चडके तिल्हारी (Chadke Tilhari) म्हणतात; तर लहान 'तिलहारी' रोज परिधान केले जाते. त्याचा आकार लहान असो किंवा मोठा अशा दोन्ही पद्धतीचा असतो. नेपाळी विवाहित महिलांसाठी ‘तिल्हारी’ खूप महत्त्वाचा अलंकार आहे.