मागच्या अनेक वर्षांपासून प्री- वेडिंग फोटोशूटची (Pre Wedding Photoshoot) क्रेझ जबरदस्त वाढलेली आहे. पुर्वी आपापल्या शहरात प्रसिद्ध असणाऱ्या जागा गाठणं आणि तिथे जाऊन फोटो शूट करणं, असं चालायचं. पण दिवसेंदिवस मात्र याचं प्रस्थ चांगलंच वाढत चाललं आहे. आता तर दुसऱ्या राज्यात किंवा काही उच्चभ्रू लोक तर परदेशांत जाऊनही प्री- वेडिंग फोटोशूट करत आहेत. पण ही केरळमधील नवरी (Pre-wedding photo shoot in the middle of road) मात्र याला अपवाद ठरली आहे. फोटोशूट करण्यासाठी तिने जी काही जागा निवडली आहे, ती पाहून नेटिझन्स चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.
आपण आजपर्यंत जे काही बघत आलो आहोत किंवा प्री- वेडिंग शूटबाबत आपण जे काही ऐकलं आहे, त्यानुसार आपल्याला एवढं माहिती आहे, की यासाठी एखादं छान निसर्गरम्य ठिकाण निवडलं जातं.
अनेकदा समुद्रकिनारी देखील प्री- वेडिंग फोटोशूट केलं जातं. गर्द झाडी- आकर्षक फुलं किंवा बॅकग्राऊंडला खूप छान सीन असेल अशी ठिकाणं याबाबतीत हिट असतात. पण या केरळमधील एका नवरीने मात्र कमालच केली आहे. तिने चक्क खड्डे असणाऱ्या एका वर्दळीच्या रस्त्यावर मधोमध उभं राहून फोटोशूट केलं आहे. नुकताच पाऊस पडून गेल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणीही साचलंय आणि अशा ठिकाणी ही नवरी मात्र भरजरी शालू, गळाभर दागिने घालून ऐटीत चालते आहे.
arrow_weddingcompany या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून "Bride photoshoot in the middle of the road" असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे.
प्लेन साडी- डिझायनर ब्लाऊज, दिसाल स्टनिंग! नवरात्र- दसऱ्यासाठी साडी खरेदीच्या १० खास आयडिया
आता या नवरीने फोटोशूटसाठी नेमकी हीच जागा का निवडली हे काही समजत नाहीये. पण अनेक जणांचं म्हणणं आहे की रस्त्यांवरचे खड्डे हा केरळमधील मोठा प्रश्न असून या नवरीने तिच्या फोटोशूटच्या माध्यमातून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसं असेल तर खरोखरच या नवरीने जे काही केलं, ते कौतूकास्पद म्हणावं लागेल.