Join us  

बिपाशा बसू म्हणते मला डोहाळे लागलेत, सारखा खावासा वाटतोय हा 'गोड' पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 1:27 PM

Viral Photos of Pregnant Bipasha Basu: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) आणि आता त्या पाठोपाठ अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) यांना कशाचे डोहाळे लागले आहेत, याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. 

ठळक मुद्देआता बिपाशाचे डोहाळे पुरविण्यासाठी तिचे किती चाहते पुढाकार घेतील, हे काही सांगता येत नाही. 

कोणतीही स्त्री गरोदर ( Bipasha Basu's pregnancy) झाली की तिला डोहाळे (dohale) लागणं म्हणजेच काही पदार्थ खूप मनापासून खावेसे वाटणं, ही तिच्या घरातल्या लोकांसाठी किंवा तिच्या जवळच्या लोकांसाठी अगदी कौतूकाची गोष्ट असते. ९ महिन्यांत तिला जे काही खावंसं वाटेल, ते ते देण्यासाठी घरचे लोक, मित्रमैत्रिणी अगदी तयार असतात. गरोदर महिलांना "काय खावंसं वाटतंय गं?" हा प्रश्न हमखास विचारला जातोच. कारण त्याबद्दल सगळ्यांनाच मोठं कुतूहल असतं. असंच कुतूहल सध्या आलिया भट आणि बिपाशा बसू (sugar craving to Bipasha Basu) यांच्या चाहत्यांनाही वाटत आहे.

 

बिपाशाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम (baby shower) नुकताच उत्साहात पार पडला. खास बंगाली पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात बिपाशा अतिशय सुंदर दिसत होती.

हत्ती करतोय मुलीची नक्कल! सांगा कुणाचा डान्स अधिक छान, मुलीचा की हत्तीचा? व्हिडिओ व्हायरल

बंगाली पद्धतीनुसार तिच्या डोहाळे जेवणाचा मेन्यूही खूप खास होता. पण तिने शेअर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये बिपाशाला ज्या गोड पदार्थाचे डोहाळे लागले आहेत, तो पदार्थ काही दिसला नव्हता. त्यामुळे खरंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. पण डोहाळेजेवण झाल्यानंतर कदाचित तिला हा गोड पदार्थ खावासा वाटला असावा, असंही तिच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे. 

 

बिपाशाला ज्या गोड पदार्थाचे डोहाळे लागले आहेत, तो गोड पदार्थ म्हणजे जिलेबी. तिने दोन दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.

व्यायाम करायला वेळ नाही? तातडीने आहार बदला, ५ टिप्स- व्यायाम न करताही राहाल फिट

यात ती चक्क जिलेबी खाताना दिसली. निळ्या ड्रेसवर पांढरं श्रग आणि ओठांना डार्क गुलाबी लिपस्टिक लावलेली बिपाशा त्या फोटोंमध्ये अगदी अधिरतेने जिलेबी खाताना दिसत होती. "Finally some sugar craving." असं कॅप्शन तिने या स्टोरीला दिलं होतं. आता बिपाशाचे डोहाळे पुरविण्यासाठी तिचे किती चाहते पुढाकार घेतील, हे काही सांगता येत नाही. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलबिपाशा बासूआलिया भटप्रेग्नंसी