टेलिव्हिजनवर सीताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली देबिना बॅनर्जी सध्या आपल्या प्रेग्नंसीमुळे बरीच चर्चेत आहे. टेलिव्हिजनपासून दूर असूनही चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये देबिनासुद्धा आहे. छोट्या पडद्यापासून मोठया पडद्यापर्यंत सर्वत्र तिची चर्चा असते. सध्या तिची इंस्टाग्राम पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतेय. ( Pregnant debina bonnerjee pulls off headstand during workout session don-t miss the caption)
प्रेग्नंसीत देबिनाचा हेडस्टॅण्ड
ज्या लोकांनी वर्कआऊटला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं आहे. त्यांनाच कल्पना असू शकते की हेडस्टॅण्डच्या स्थिती उभं राहणं काही खायचं काम नाही. हेडस्टॅण्डसाठी खूप मेहनत आणि सरावाची गरज असते. देबिनानं प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यात हेडस्टॅण्ड करून सरप्राईज दिलं आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हेडस्टॅण्ड करत असलेल्या देबिनाची पती गुरमीत चौधरी देखरेख करत आहे.
गुढी पाडव्यासाठी सोप्या, आकर्षक रांगोळी डिजाईन्स; कमी वेळात काढता येतील १० सुंदर रांगोळ्या
देबिनानं हा फोटो शेअर करताना यामागची स्टोरीसुद्धा शेअर केली आहे. तिनं म्हटलं की, मी रातोरात हेडस्टँड करायला शिकलेली नाही. प्रेग्नंसीच्या आधीपासूनच ती याची प्रॅक्टीस करत आहे. त्यामुळे तिला शिर्षासन करण्यात कसलीच भिती वाटत नाही. जर तुम्हाला हेडस्टॅण्ड करायचे असेल तर योगा प्रशिक्षकाची मदत घेऊन प्रयत्न करा.