चार दिवस गावाला जायचं तर बायका किती तयारी करुन जातात (Japanese Pregnant Women). कामं संपत नाहीत. हजार याद्या, हजार तयाऱ्या. पण या बाईची कथाच वेगळी (Social Viral). बाई बाळंतपणाला माहेरी जाणार तर नवऱ्याच्या खाण्यापिण्याची काळजी म्हणून तिनं महिनाभराचा स्वयंपाक करुन फ्रिजमध्ये ठेवला. तिचं नवऱ्यावरचं प्रेम मान्य पण दोन जिवांची अवघडलेली बाई नवऱ्यासाठी राबराब राबते याचं कौतुक करावं की बाई गं शांत हो, तो त्याचं करुन खाईन म्हणून सल्ला द्यावा या विवंचनेत नेटवरची व्हायरल चर्चा अडकली आहे.
खरंतर जगात देश कोणताही असो बाईला चूल आणि मूल कोणालाही सुटलेलं नाही. घरची साफसफाई, स्वयंपाक, सासू - सासरे, मुलं आणि नवऱ्याचं करणं त्यात आलंच. शिवाय जॉब करणारी महिला असेल तर, तिची तारेवरची कसरत होतेच(Pregnant Japanese Woman Prepares A Month Of Meals For Husband Before Going Into Labour, Triggers Debate).
चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक
अशीच एक गृहकृत्यदक्ष महिला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, प्रसूतीनंतर जपानची ही महिला तिच्या आई-वडिलांच्या घरी राहणार होती. त्यामुळे तिच्या पतीची काळजी घेणारे कोणी नसेल या चिंतेत ती होती. या कारणास्तव, तिने प्रेमापोटी पतीसाठी महिनाभर पुरेल इतकं जेवण तयार करून फ्रिजरमध्ये ठेवलं. मे महिन्याच्या अखेरीस प्रसूतीपूर्वी महिलेने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. महिलेने जरी पतीच्या प्रेमापोटी हे सगळं केलं असलं तरी, पतीला नेटकरी आता ट्रोल करीत आहेत.
शाळा उघडली की मुलांना खायला द्या ४ पदार्थ, मुलांचं अभ्यासात लागेल लक्ष-वाढेल एकाग्रता
पत्नीने जरी काळजी आणि प्रेम भावनेतून पतीसाठी जेवण केलं असलं तरी, नेटकऱ्यांनी पतीला धारेवर धरलं. एकाने 'पती आपल्या गर्भवती पत्नीची एवढीही मदत करू शकत नाही का?', तर दुसऱ्याने '३० दिवस पती स्वतः अन्न नाही का शिजवू शकत'? तर आणखीन एकाने 'गर्भवती महिला एक जीव पोटात वाढवत आहे. यात तिला पतीचीही काळजी घ्यावी लागत आहे, ती दासी आहे का?' असं म्हणत नेटकऱ्यांनी पतीला फटकारलं.
काहींनी बायकोचे केले कौतुक?
काहींनी पत्नीचं कौतुक केलं. गर्भवती असूनही पतीची काळजी घेतल्याबद्दल कौतुक केलं. एका वापरकर्त्याने, 'गर्भवती असून इतकं करणं खरंच कौतुकास्पद आहे. पण पतीचे इतके लाड करू नका.'; तर आणखीन एकाने, 'ही केवळ जपानच्या महिलांची समस्या नसून, प्रत्येक महिलेची आहे.'