Join us  

प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 3:40 PM

Preity Zinta's Viral Video: गार्डनिंगची हौस जोपासल्यानंतर बघा प्रीती झिंटाला आता कुठला नवा छंद जडला आहे (pottery art)....

ठळक मुद्देप्रीती कशाप्रकारे मातीची भांडी बनवत आहे, हे तुम्ही पाहिले का? आता हा कोणता नवा छंद प्रीतीला जडला आहे, असा प्रश्न व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना पडला आहे.

गालावरच्या मोहक खळीने अनेकांना वेड लावणारी अभिनेत्री प्रीती झिंटा (bollywood actress Preity Zinta) सध्या बॉलीवूडपासून बरीच दूर गेली आहे. पण असे असले तरी तिची क्रेझ मात्र अजूनही तशीच आहे. सध्या तिची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून यामध्ये प्रीती झिंटा चक्क मातीची भांडी बनवताना दिसते आहे. आता हा कोणता नवा छंद प्रीतीला जडला आहे, असा प्रश्न व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना पडला आहे. प्रीती कशाप्रकारे मातीची भांडी बनवत आहे, हे तुम्ही पाहिले का? (Preity Zinta's viral video of learning pottery)

 

आपल्याला माहितीच आहे की सध्या प्रीती तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत परदेशात रमली आहे. मध्यंतरी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कोणाकडे जाणे येणे नव्हते. त्यामुळे त्या काळात आलेला एकटेपणा घालविण्यासाठी प्रीतीने झाडांमध्ये मन रमवून घेतले.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ काेणती, उशीर झाला तर ॲसिडीटी वाढते- सुस्ती येते? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय

गार्डनिंगचा तिला चांगलाच नाद लागला होता. तिच्या बागेत उगवलेल्या वेगवेगळ्या झाडांचे, बागेतल्या फळांचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता गार्डनिंगचा छंद पूर्ण केल्यानंतर प्रीती चक्क पॉटरी कलेकडे वळाली आहे. मैत्रिणींसोबत पॉटरी शिकण्यात तिला किती मजा येते, हे तिने ह्या व्हिडिओतून सांगितले आहे.

 

गार्डनिंग असो किंवा पॉटरी असो, दोन्ही कलांच्या माध्यमातून प्रीतीने दिलेला संदेश आपल्या सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारा आहे. कधीकधी तेच ते काम नकोसे होऊन जाते. शारीरिकदृष्ट्या फिट दिसत असलो, तरी मानसिकदृष्ट्या खूप थकून गेल्यासारखे होते.

फक्त एका बटाट्याची जादू! डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळंच नाही तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

घरात, कामात लक्ष लागत नाही. किंवा कधी कधी कामाचा ताण खूप जास्त वाढलेला असतो. अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसिक समाधान हवे असेल किंवा मनावरचा ताण कमी करायचा असेल, तर अशी एखादी कला शिकणे किंवा आधीपासूनच येत असलेल्या कलेमध्ये काही वेळ मन रमवणे नक्कीच उपयुक्त ठरू शकते. मनावरचा ताण कमी करण्यासाठी किंवा एकटेपणा घालविण्यासाठी कधीतरी असे करून बघायला काय हरकत आहे...

 

टॅग्स :सोशल व्हायरलप्रीती झिंटाकला