सोमवारी अनेक जणींच्या मागे स्वत:च्या- नवऱ्याच्या ऑफिसची गडबड, मुलांच्या शाळा- कॉलेजची घाई असते. अशा धावपळीत हरितालिकेच्या पुजेची तयारी करून, पूजा करून ऑफिस वेळेवर गाठणं म्हणजे मोठीच कसरत (How to do hartalika pooja?). त्यामुळे आदल्या दिवशी थोडी फार तयारी करून ठेवा. म्हणजे मग ऐनवेळी धांदल होणार नाही. पूजाही शांततेत होईल आणि मग ऑफिसही वेळेवर गाठता येईल. म्हणूनच आदल्या दिवशी नेमकं काय काय करून ठेवता येऊ शकतं ते आता पाहूया....(Hartalika pooja vidhi preparation)
हरितालिकेच्या पुजेची तयारी कशी करायची?
१. सजावट आणि मांडणीहरितालिकेची पुजा जिथे मांडायची आहे ती पुर्ण जागा स्वच्छ करून तिथे हवं तसं डेकोरेशन करून तयार ठेवा.
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट
पुजा मांडण्यासाठी पाट, चौरंग, त्यावर टाकायचे वस्त्र, तुम्हाला बसण्यासाठी आसन असे सगळे मांडून ठेवा. पुजेसाठी लागणारे तांब्या, फुलपात्रे, पळी, ताम्हण, दिवा, समई स्वच्छ करून पुजेच्या ठिकाणी ठेवून द्या. पुजेसाठी लागणारं पंचामृत रात्रीच कालवून फ्रिजमध्ये ठेवून द्या.
२. पुजेची थाळीविड्याची पानं, सुपारी, एक- दोन रुपयांची नाणी, पंचामृत, खडीसाखर, दूध, हळद- कुंकू, गुलाल, अक्षदा, धूप किंवा उदबत्ती, काडेपेटी, दोर वाती, फुल वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं पुजेच्या ताटात तयार करून ठेवा.
हरितालिकेच्या पुजेसाठी फुलं, हार लागतात ते आदल्या दिवशीच करून ठेवा. तसेच पुजेवर वाहायला पत्री लागतात ती ही आदल्यादिवशीच आणून धुवून स्वच्छ करून ठेवून द्या..
३. वाळूची स्वच्छतामराठवाड्यात आणि इतरही काही भागात वाळूपासून महादेवाची पिंड करतात आणि त्याची पुजा हरितालिकेच्या दिवशी करतात.. यासाठी लागणारी वाळू आदल्या दिवशीच स्वच्छ धुवून ठेवा.