साफसफाई करण्यासाठी लोक घरांत वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करतात. सोशल मीडियावर साफ-सफाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. (Easy Socks Hacks To Clean Tiles And Wall) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मोजे वायपरमध्ये घालून साफ-सफाई करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. भिंती किंवा टाईल्सचा खालचा भाग तुम्ही सहज स्वच्छ करू शकता. वरच्या भागाची साफ-सफाई करणं थोडं कठीण असतं. भिंतीला चिकटलेली धूळ, जाळी याची साफ-सफाई करणं यासाठी मोजे लावलेला वायपर उत्तम ठरेल. (Home Hacks & Tips)
1) भिंतीचे जाळे धुळीची साफ-सफाई करा
भिंत आणि छताच्या कानाकोपऱ्यात धूळ जमा होते. जे साफ करण्यासाठी खास लांब झाडूचा वापर केला जातो. धूळ आणि जाळे साफ करण्यासाठी वायपर दोन्ही बाजूंनी फिरवून जुने मोजे घाला. मोजे घातल्यानंतर डिटर्जेंटच्या पाण्याने ओले करून धूळ आणि जाळी स्वच्छ करा. डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवल्यास घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
१० रूपयांत बदामापेक्षा जास्त प्रोटीन देतात मूठभर शेंगदाणे; नियमित खा-दमदार होईल शरीर, फिट राहाल
2) बेड सोफा-सहज स्वच्छ करता येतो
भिंती आणि छताव्यतिरिक्त व्हायपरमध्ये मोजे घालून तुम्ही खाली जमा झालेली धूळ स्वच्छ करू शकता. सोफा आणि बेडवर व्यवस्थित हात पुरत नसतील तर धूळ, घाण त्यात जमा होते. वायपरच्या मदतीने सोफा बेड स्वच्छ करा.
3) बाथरूमच्या भिंती साफ करा
सॉक्स आणि व्हायपर डिटर्जेंटमध्ये पाणी मिसळा. पाणी लागल्याने धूळ, बुरशी लागते. अशावेळी घाणं स्वच्छ करणं कठीण होतं. पाणी, धुळीचे थर बाथरूमध्ये टाईल्सवर लागतात ज्यामुळे साफसफाई करण्यासाठी वायपर किंवा मोज्याचा वापर करू शकता. वायपरचा वापर केल्यास फरशी नव्यासारखी दिसेल. भिंतीवरही डाग लागणार नाहीत. भिंती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणत्याही लिक्वीड डिटर्जेंटचा वापर करू शकता.