Join us  

प्रेशर कुकरच्या शिट्टीत तेल घालताच झाली कमाल, फसफसून पाणी बाहेर येणार नाही; भिंत - शेगडीही राहील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 2:36 PM

Prevent Water Leakage from Your Pressure Cooker : प्रेशर कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी बाहेर येत असेल तर; 'ही' सोपी युक्ती करून पाहा..

स्वयंपाक झटपट होण्यासाठी आपण प्रेशर कुकरचा वापर करतो (Pressure Cooker). प्रेशर कुकरमध्ये अन्न झटपट शिजते. वेळ आणि गॅसचीही बचत होते. प्रेशर कुकरचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत (Kitchen Hacks). प्रेशर कुकरमध्ये आपण शक्यतो डाळ किंवा भात शिजत घालतो (Cooking Tips). बऱ्याचदा शिट्टी होताना त्यातून वरणाचं पाणी किंवा इतर पदार्थातील पाणी फसफसून बाहेर येतं. अशावेळी प्रेशर कुकर तर घाण होतेच, शिवाय गॅस शेगडीही खराब होते.

शिवाय किचनमधली भिंतही खराब होते. त्यामुळे प्रेशर कुकरचा वापर सावधगिरीनं करायला हवा. प्रेशर कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येऊन नये, शिवाय शेगडी खराब होऊ नये यासाठी, एका व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेने किचन टिप्स सांगितले आहे. यामुळे प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येणार नाही(Prevent Water Leakage from Your Pressure Cooker).

प्रेशर कुकर शिट्टीतून येणाऱ्या पाण्यामुळे घाण होऊ नये म्हणून..

- व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने प्रेशर कुकरमधून फसफसून बाहेर येणाऱ्या पाण्यावर उपाय सांगितला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आपण ही युक्ती वापरून पाहू शकता.

सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच

- व्हायरल किचन हॅकमध्ये तिने एक युक्ती सांगितली आहे. जर प्रेशर कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी किंवा वरण बाहेर येत असेल तर, सर्वात आधी शिट्टी बाहेर काढा. त्यात कोणत्याही तेलाचे ४ - ५ थेंब ओता. नंतर त्यावर शिट्टी लावा.

रोज किती चमचे तेल खाल्ले तर वजन कमी होते? पाहा सोपे स्वयंपाक सूत्र, वजन वाढणार नाही..

- आता कुकरच्या झाकणाचे गॅस्केट काढा. त्यात असलेल्या जागेत चमचाभर तेल ओतून गॅस्केट पुन्हा लावा. आता प्रेशर कुकरचं झाकण लावा. आणि प्रेशर कुकर गॅसवर ठेवा.

- या युक्तीमुळे प्रेशर कुकरच्या शिट्टीतून फसफसून निघणारं पाणी येणार नाही. शिवाय किचनमधली भिंत, शेगडीही खराब होणार नाही. 

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल