अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि नीक जोनास ( Priyanka Chopra and Nick Jonas ) यांची लेक मालती (Malati) हिची सोशल मिडियावर नेहमीच बरीच चर्चा असते. प्रियांका आणि नीकसोबत काही फोटोंमध्ये मालती दिसते. पण अजूनही त्या दोघांनीही तिचा चेहरा मिडियापासून लपवून ठेवला आहे. त्यामुळे प्रियांकाची ही लेक नेमकी दिसते कशी, याबाबत तिच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सूकता आहे. आताही प्रियांकाने तिचे २ फोटो इन्स्टाग्रामवर (viral photos of Priyanka's daughter) शेअर केले आहेत. पण या दोन्ही फोटोंतही मालतीचा चेहरा दिसत नाही. पण या फोटोंमुळे प्रियांकाचे चाहते तिच्यावर भलतेच इम्प्रेस झाले असून प्रियांकाचे 'आई' म्हणून ते खूपच कौतूक करत आहेत.
आता नेमकं प्रियांकाने एक आई म्हणून असं काय केलं, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर त्याचं झालं असं की कोणतीही भारतीय आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी ज्या काही प्रथा- परंपरा पाळते किंवा बाळाच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही गोष्टींवर विश्वास ठेवते, त्यापैकी काही गोष्टी प्रियांका परदेशात राहूनही तिच्या लेकीसाठी करते आहे. आणि हीच गोष्ट अनेकांना मोठी कौतूकाची वाटली आहे.
प्रियांकाने तिचे आणि मालतीचे जे २ फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये मालतीचा हात दिसतो आहे. तिच्या हातात प्रियांकाने काळा दोरा बांधला आहे. तर दुसऱ्या फोटोत मालतीचा पाय दिसतो आहे.
मालतीने तिचे दोन्ही पाय प्रियांकाच्या चेहऱ्यावर ठेवले असून, प्रियांका अत्यंत स्नेहपूर्ण नजरेने आणि अतिशय मायेने लेकीला न्याहाळते आहे. या फोटोमध्ये मालतीच्या पायांमध्ये काळे मणी आणि सोन्याचे मणी असणारा एक वाळा दिसतो आहे. या वाळ्याला बदामाच्या आकाराचे छोटंसं पेंडंटही आहे. आपल्याकडे लहान मुलांना नजर लागू नये, म्हणून त्यांच्या हाता- पायात अशा पद्धतीने वाळे किंवा मनगट्या घातल्या जातात. परदेशात राहूनही प्रियांका एका भारतीय आईप्रमाणे तिच्या लेकीला वाढवते आहे, ही गोष्ट तिच्या चाहत्यांना अतिशय महत्त्वाची वाटते आहे.