Join us  

‘मिस इंडिया’ झाल्यावरही प्रियांका स्वत:ला सुंदर समजत नव्हती! प्रियांका चोप्राची आई सांगते कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 3:18 PM

Priyanka Chopra And Her Complexion: जिच्यासारखं होण्याची स्वप्नं आज भारतातल्या अनेक मुली बघतात, ती प्रियांका चोप्रा स्वत:ला का सुंदर समजत नव्हती बरं? वाचा त्यामागचं नेमकं काय कारण सांगत आहेत तिची आई मधू चोप्रा (Madhu Chopra)...

ठळक मुद्देलहानपणी मात्र तिला रंगामुळे जे काही ऐकावं लागायचं त्यामुळे बरीच वर्षे तिचा तिच्याच सौंदर्यावर विश्वास बसायचा नाही... 

प्रियांका चोप्रा हे नाव आज फक्त भारतापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. कारण बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूड गाजवून प्रियांका आता एक आंतरराष्ट्रीय किर्तीची स्टार म्हणून ओळखली जाते. तिचं दिसणं, तिचा अभिनय, तिची स्टाईल याचे करोडो चाहते आहेत. भारतातल्याच नाहीत तर जगभरातल्या कित्येक तरुणी प्रियांकासारखं होण्यासाठी- दिसण्यासाठी धडपड करत असतात. पण हीच प्रियांका चोप्रा मात्र अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वत:ला सुंदर मानत नव्हती. एवढंच नाही तर 'मिस इंडिया' झाल्यानंतरही तिला आपण खरोखरच सुंदर आहोत यावर विश्वास नव्हता. असं का होतं? यामागचं नेमकं कारण तिच्या आई मधू चोप्रा यांनी नुकतंच सांगितलं आहे (Priyanka Chopra was not considering herself beautiful, Because of her complexion)..

 

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांची Bollywood Hungama यांनी नुकतीच मुलाखत घेतली.

थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

या मुलाखतीमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की चोप्रा परिवारात सगळे जण एकदम गोरेपान आहेत. प्रियांकाचे बाबा मात्र गव्हाळ रंगाचे होते. रंगाच्या बाबतीत प्रियांका तिच्या बाबांवर गेली. त्यामुळे लहानपणापासून तिला तिच्या रंगाबाबत अनेक टोमणे ऐकावे लागायचे. याचा परिणाम तिच्या मनावर होत होता. त्यात प्रियांकाचे एक नातलग तर तिला तिच्या रंगाबाबत नेहमीच बोलायचे. पण तिने कधीही त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवला नाही.

 

त्याउलट तिने स्वत:मध्ये खूप बदल केले. जे नातेवाईक तिला लहानपणी टाेमणे मारायचे, त्यांना ती ठणकावून सांगतेय की आज मी जी कोणी आहे ती केवळ तुम्ही मारलेल्या टोमण्यांमुळेच.

ओठांचा काळपटपणा जाईल आणि ओठ होतील गुलाबी, करा १ सोपा उपाय- विकतचे लिपबाम विसराल

कारण दरवेळी तुमचे शब्द मला स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा द्यायचे. मधू असंही म्हणाल्या की गव्हाळ रंगाची असली तरी प्रियांका नेहमीच सुंदर दिसायची आणि दिसते. पण लहानपणी मात्र तिला रंगामुळे जे काही ऐकावं लागायचं त्यामुळे बरीच वर्षे तिचा तिच्याच सौंदर्यावर विश्वास बसायचा नाही... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलप्रियंका चोप्राबॉलिवूडहॉलिवूड