Join us

विदेशी पत्रकाराला देसी गर्लचा दणका, प्रियांका चोप्राने ठणकावूनच सांगितलं.. व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 18:20 IST

Priyanka Chopra's Viral Video : प्रियांका चोप्राला फेमिनिझमसाठी चिडवणाऱ्या पत्रकाराची तिने बोलतीच बंद केली.

भारतातील अभिनेत्रींच्या बोलण्यात सतत फेमिनिझम हा शब्द येत असतो.(Priyanka Chopra's Viral Video) त्यांना बरेचदा या फेमिनिझमवरून उलट-सुलट ऐकून घ्यावे लागते. पण बॉलिवूडची देसी गर्ल कधीच उत्तर देण्यात मागे पडत नाही.(Priyanka Chopra's Viral Video) मग कॉफी विथ करणचा शो असो, हिंदी मिडिया असो किंवा मग अगदी विदेशी पत्रकार असो. प्रियांका चोप्रा नेहमीच समोरच्याची बोलती बंद करणारी उत्तरं देते.(Priyanka Chopra's Viral Video) असाच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मुलाखत जूनी असली तरी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

ग्लोबल एजुकेशन आयोजित मुलाखतीत प्रश्न उत्तर फेरी सुरू असताना एका विदेशी पत्रकाराने प्रियांकाच्या स्त्रीवादी विचारांची खिल्ली उडवत तिला एक विचित्र प्रश्न विचारला.(Priyanka Chopra's Viral Video) त्याने विचारले, जर एखाद्या मुलाने मुलीला छेडले आणि मुलीने त्याला थोबाडीत मारले तर त्या मुलीने त्या मुलाला मारणे योग्य आहे का अयोग्य? हा प्रश्न ऐकल्यावर प्रियांका उत्तर द्यायला भलतीच प्रेरित झाली. तिने सांगितले, जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला छेडत असेल तर तिने त्याला मारणे नक्कीच योग्य आहे.(Priyanka Chopra's Viral Video) यावर पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला, मग ज्या समानतेच्या टिमक्या तुम्ही वाजवता, ती समानता गेली कुठे?

यावर प्रियांकाने खूपच भारी उत्तर दिले. ती म्हणाली, मी जेव्हा समानतेबद्दल बोलते, तेव्हा मी बौद्धिक कामाबद्दल बोलते. मी एखाद्या पुरूषाला उचलून पटकू शकते असा दावा करत नाही. पण तो जर कंपनी सीईओ होऊ शकतो, तर मी सुद्धा होऊ शकते. स्त्री-पुरूष शरीराने वेगळे असतात. शारीरिक क्षमतेत फरक असतो. पण मानसिक क्षमता माणसानुसार ठरते. त्यामुळे जर एक पुरूष वडील आणि सीईओ होऊ शकतो, तर मी झाल्यावर आई आणि काम दोन्ही भूमिका निभावता येईल का असे प्रश्न मला कोणी विचारू नयेत. कारण माझी तेवढी क्षमता नक्कीच आहे.

जर एखाद्या मुलाने मुलीची छेड काढली आणि मुलीने त्याला मारले, तर तो त्याच पात्र आहे. कारण मुलींना छेडणं हा गुन्हा आहे. समानतेचा काही संबंध नाही.

टॅग्स :प्रियंका चोप्रामुलाखतमहिला