Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात घरभर माश्या घोंघावतात? १ सोपा उपाय, माश्या आणि त्रास होईल गायब

पावसाळ्यात घरभर माश्या घोंघावतात? १ सोपा उपाय, माश्या आणि त्रास होईल गायब

Problem of Flies in home 1 easy solution on it : अशी कोणती युक्ती आहे ज्यामुळे या माश्या नष्ट होण्यास मदत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 02:33 PM2023-07-27T14:33:05+5:302023-08-02T10:05:01+5:30

Problem of Flies in home 1 easy solution on it : अशी कोणती युक्ती आहे ज्यामुळे या माश्या नष्ट होण्यास मदत होईल

Problem of Flies in home 1 easy solution on it : Do flies swarm the house during the rainy season? 1 simple solution to get rid of flies, they will disappear-diseases will go away | पावसाळ्यात घरभर माश्या घोंघावतात? १ सोपा उपाय, माश्या आणि त्रास होईल गायब

पावसाळ्यात घरभर माश्या घोंघावतात? १ सोपा उपाय, माश्या आणि त्रास होईल गायब

पावसाळा आला की डास, माश्या, चिलटं यांची समस्या वाढायला लागतो. ओलावा असतो त्याठिकाणी या किटकांना पोषक वातावरण असल्याने त्यांचा विहार वाढतो. फळं-भाज्या किंवा तत्सम वस्तू ओट्यावर किंवा टेबलवर ठेवल्या तर अगदी काही क्षणांत त्याठिकाणी असंख्य चिलटं घोंघावताना दिसतात. डास तर कुठ कुठे दडून बसलेले असतील सांगताही येत. नाही. माश्याही त्यातलाच एक प्रकार, विचित्र आवाज काढत सगळीकडे घोंघावणाऱ्या या माश्या अगदी कुठेही बसलेल्या असतात. ओल्या भांड्यांवर, कपड्यांवर, अंगावर अगदी कोणत्याही वस्तूंवर या माश्या घोंघावत राहतात (Problem of Flies in home 1 easy solution on it). 

एकतर त्यांचा आवाज नकोसा होतो आणि त्या अंगाभोवती फिरत असतील तर त्यामुळे होणाऱ्या गुदगुल्यांचा त्रास वेगळाच. इतकेच नाही तर या माश्या कचरा, चिखल किंवा अन्य कोणत्याही खराब गोष्टीवर बसून नंतर अन्नावर बसतात. त्यामुळे त्यांच्यामार्फत घाणीचा प्रसार होतो. हेच अन्न आपल्या पोटात जाते आणि त्यामुळे पावसाळ्यात विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे या माश्यांचा वेळच्या वेळी बंदोबस्त करणे अतिशय गरजेचे असते. त्या इतक्या वेगाने उडतात की त्यांना पकडणे किंवा मारणे आपल्याला शक्य होत नाही. मग घरच्या घरी करता येणारी अशी कोणती युक्ती आहे ज्यामुळे या माश्या नष्ट होण्यास मदत होईल ते पाहूया... 

१. आपल्या घरात युज अँड थ्रोचे काही डबे असतात. एक काटा चमटा थोडा गॅसवर गरम करुन त्याने या डब्यांना बारीक होल पाडायचे. हे होल डब्याच्या सगळ्या बाजुंना असतील याची काळजी घ्यायची. 

२. त्यानंतर जितके डबे आहेत त्या सगळ्या डब्यांमध्ये जवळपास अर्धे डबे भरतील इतके साधे मीठ भरुन ठेवायचे. 

३. या मीठावर फॅब्रिक सॉफ्टनर किंवा लिक्विड डीश वॉश घालायचा आणि हे मित्रण एकजीव करुन घ्यायचे.

४. या दोन्ही सोल्यूशनला चांगला वास असल्याने घरात छान वास राहतो आणि एअर फ्रेशनर मारण्याचीही आवश्यकता राहत नाही. 


५. त्यानंतर या मिश्रणात बाजारात मिळणाऱ्या फिनाईलच्या गोळ्या घालायच्या. डबे मोठे असल्यास ४ ते ५ नाहीतर २ गोळ्या घातल्या तरी चालतात. 

६. हे डबे बंद करुन खिडक्या किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये ज्याठिकाणी जास्त माश्या येतात तिथे ठेवावेत. 

७. साधारणपणे तासाभरात हे डबे ठेवलेल्या ठिकाणी माश्या मरुन पडलेल्या दिसतात. त्यामुळे आपल्याला माश्यांचा खूपच त्रास होत असेल तर वैताग न करता हा सोपा उपाय नक्की ट्राय करु शकतो. 

Web Title: Problem of Flies in home 1 easy solution on it : Do flies swarm the house during the rainy season? 1 simple solution to get rid of flies, they will disappear-diseases will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.