आईच्या प्रेमापेक्षा या जगात मोठे असे काही नाही. जेव्हा एखादे लहान मूल जीवनात महत्त्वपूर्ण यश मिळवते तेव्हा आई आणि वडील सर्वात आनंदी असतात. युनायटेड स्टेट्समधील न्यू जर्सी येथील एका मुलीने डॉक्टरेट डिप्लोमा डिग्री मिळविली. या आनंदाच तिच्या आईनं मुलीचे अभिनंदन करण्यासाठी होर्डिंग लावले. (Proud us woman rents billboard to celebrate daughters doctorate degree)
या होर्डिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही आई आपल्या मुलीवर इतकी खूश झाली की तिने होर्डींग भाड्याने देण्यासाठी $1,250 म्हणजेच जवळपास ९९ हजार रुपये दिले असे एबीसी नेटवर्कची बातमी सांगते.
28 जुलै रोजी केंद्रा बुबसी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. त्यात म्हंटलं होतं.., “तु माझा चमकणारा तारा आहेस. तू कुठेही असलीस तरी चमकणारच होतीस! मी सर्वात अभिमानास्पद मम्मी आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. डॉ. क्रिस्टीन एस. स्मॉल्स.”
या पोस्टला भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा प्रतिसाद मिळाला. लोक डॉ. स्मॉल्सचे आणि केंद्रा बुबसी यांचे अभिनंदन करत आहेत. कॅमडेन जवळ विमानतळ सर्कलच्या अगदी दक्षिणेला, रूट 130 च्या बाजूने जाणारे प्रत्येकजण कदाचित डॉ क्रिस्टीन एस. स्मॉल्सचा चेहरा आणि तिच्या कर्तृत्व पाहू शकतील. म्हणून हे होर्डींग लावण्यात आले.
ABC न्युजनुसार, केंद्रा बुबसी यांची मुलगी क्रिस्टीनने 29 जुलै रोजी फिलाडेल्फिया कॉलेज ऑफ ऑस्टियोपॅथिक मेडिसिनमधून मानसशास्त्राची डॉक्टरेट मिळवली. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिला डॉक्टर व्हायचे आहे हे तिला माहीत होते. हेच हा मोठा उत्सव साजरा करण्यामागे एकमेव कारण होते,” केंद्रा बुबसी यांनी माध्यमांना ही माहिती दिली.