Lokmat Sakhi >Social Viral > पोलीसांची कमाल! भर पावसात पुण्यातील महिला पोलिसांनी बजावले असे जबरदस्त कर्तव्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

पोलीसांची कमाल! भर पावसात पुण्यातील महिला पोलिसांनी बजावले असे जबरदस्त कर्तव्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pune Lady Police Viral Video of Helping to Drain Water : पोलीस महिला आपले खाकी वर्दीतील काम करतानाच आणखी एक महत्त्वाचे काम करताना दिसत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 04:28 PM2022-09-18T16:28:27+5:302022-09-18T16:34:31+5:30

Pune Lady Police Viral Video of Helping to Drain Water : पोलीस महिला आपले खाकी वर्दीतील काम करतानाच आणखी एक महत्त्वाचे काम करताना दिसत आहे.

Pune Lady Police Viral Video of Helping to Drain Water : Hats Off to police! Awesome duty performed by women police in Pune in full rain, watching the video you will also say... | पोलीसांची कमाल! भर पावसात पुण्यातील महिला पोलिसांनी बजावले असे जबरदस्त कर्तव्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

पोलीसांची कमाल! भर पावसात पुण्यातील महिला पोलिसांनी बजावले असे जबरदस्त कर्तव्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Highlightsकर्तव्य बजावत असताना सामाजिकतेचे भान जपणारी पोलीस महिला असे म्हणत नेटीझन्सनी त्यांचे कौतुक केले.हा व्हिडिओ ट्विटरवर काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

पोलीस म्हटलं की सिग्नलला थांबून आपल्याकडून भरपूर पैसे घेणारे आणि पोलीस स्टेशनमध्ये बसून झोपा काढणारे अशी प्रतिमा आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यात असते. मग कधी त्यांनी सिग्नल तोडला म्हणून किंवा गणपती मिरवणूकीत नाचण्याचा आनंद लुटला म्हणून त्यांना ट्रोल करायलाही आपण कमी करत नाही. पोलिस असले तरी तेही आपल्यासारखे माणूसच असतात. त्यामुळे त्यांनाही मर्यादा असतात हे आपण अनेकदा लक्षातच घेत नाही. मात्र आजही असे असंख्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे आपल्या जीवाचा विचार न करता एखाद्याचा जीव वाचवतात किंवा नागरीकांच्या मदतीला पुढे सरसावतात. मात्र अशांची बातमी फार कमी वेळा आपल्यासमोर येते. नुकतीच पुण्यात अशीच एक घटना घडली असून यामध्ये एक पोलीस महिला आपले खाकी वर्दीतील काम करतानाच आणखी एक महत्त्वाचे काम करताना दिसत आहे. वेळेचे आणि परिस्थितीचे भान राखत या पोलीस महिलेने दाखवलेली तत्परता आणि भान यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे (Pune Lady Police Viral Video of Helping to Drain Water). 

(Image : Google)
(Image : Google)

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा वेग इतका जास्त आहे की काही तासांत रस्ते पाण्याने भरुन वाहताना दिसत आहेत. अशात नागरीकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. सहकारनगर वाहतूक विभागात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक साबळे यांनी वाहतूक नियमनाचे काम बजावत असतानाच सामाजिक भान जपले आहे. पाण्याला वाट करुन देण्यासाठी ड्रेनेजवर अडकलेला कचरा त्यांनी स्वतः स्वच्छ केला. हाती लागेल त्या वस्तूने त्यांनी पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी साबळे यांनी केलेले काम खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियात त्यांच्या या कामाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. 

त्यांच्या कार्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आम्हाला तुमचा अभिमान आहे, कर्तव्य बजावत असताना सामाजिकतेचे भान जपणारी पोलीस महिला असे म्हणत नेटीझन्सनी त्यांचे कौतुक केले. नाईक यांनी सुरुवातीला बॅरीकेट घालून वाहनांनी बाजूने जावे असे सूचित केले. बॅरीकेटच्या पुढे स्वत: उभ्या राहून त्या झाड़ाच्या एका मोठ्या फांदीने पाण्याला वाट करुन देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशाप्रकारे प्रसंगावधान राखून नागरीकांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही कामाची तयारी असलेली या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे खरंच कौतुक आहे. 

Web Title: Pune Lady Police Viral Video of Helping to Drain Water : Hats Off to police! Awesome duty performed by women police in Pune in full rain, watching the video you will also say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.