तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी एका पॉईंटला तुम्हाला काम आणि घर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्याच लागतात. दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित जमाव्या असं वाटत असेल तर दोघांमध्येही एक रेषा ओढणं गरजेचं असतं. तरच तुम्ही त्या- त्या वेळी या दोन्ही गोष्टींवर फोकस करू शकता. असंच काहीसं केलं आहे 'पुष्पा' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ('Pushpa' actress Rashmika Mandanna) हिने. तिचे कुटूंब आणि काम यांच्यात सुरुवातीला कशी गल्लत होत होती आणि तिने त्यातून नेमका कसा मार्ग काढला, याविषयीची माहिती तिने नुकतीच बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत दिली.
रश्मिका म्हणते की सुरुवातीला तिच्या आईला वाटायचं की रश्मिका एक अभिनेत्री असल्याने तिचे तिच्या कामावर पुर्णपणे नियंत्रण आहे. तिला जे वाटते ती ते तेव्हा करू शकते. पण वास्तवात असं नसतं, हे आईला समजलं.
घरात पाल दिसली की भीती वाटते? ३ उपाय, पाली आपल्या घरापासून राहतील लांब
तुम्ही एक कलाकार असता, अभिनेत्री असता. त्यामुळे तुमच्यावर जो कोणता चेहरा येईल, तो घेऊनच तुम्हाला वावरावं लागतं, हे ही आईला लक्षात आलं. चित्रपटाचं कोणतंही बॅकग्राऊंड नसल्याने आईवडिलांना माझ्या या नव्या करिअरशी जुळवून घेणं आणि मलाही माझं काम आणि कुटूंब यांच्यात बॅलेन्स राखणं जमायचं नाही.
पण आता त्यांना आणि मला दोघांनाही समजलं आहे की ते एका सामान्य बॅकग्राऊंडमध्ये असल्याने ते माझ्या कामात जास्त लक्ष घालू शकत नाहीत आणि त्यांनी ते घालूही नये.
महागडं केशर विकत आणलं पण ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? ३ सोपे उपाय, ओळखा केशरातली भेसळ
कारण त्यांना हे सगळं झेपणारं नाही. माझे पालक मुळचे कुर्गचे आहेत. तिथलं त्यांचं जीवन अतिशय शांत, आरामदायी आहे. त्याउलट माझं आयुष्य आहे. म्हणूनच त्यांनी त्यांचं जीवन शांतपणे जगावं आणि मी माझ्या कामावर फोकस करावं, त्यांनी माझं करिअर, आयुष्य कंट्रोल करू नये कारण हे जग तसं नाहीये, असा धडा आम्ही सगळ्यांनीच घेतला आहे.