Lokmat Sakhi >Social Viral > परदेशातही ‘पुष्पा’ची जादू कायम; पाहा कोरीयन तरुणीचा ‘श्रीवल्ली’गाण्यावरचा भन्नाट डान्स...

परदेशातही ‘पुष्पा’ची जादू कायम; पाहा कोरीयन तरुणीचा ‘श्रीवल्ली’गाण्यावरचा भन्नाट डान्स...

Pushpa Movie Srivalli Dance of Allu Arjun by South Korean Girl Viral Video : भारतातच नाही तर परदेशातही हा चित्रपट आणि हे गाणे चांगलेच गाजले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 11:04 AM2022-11-17T11:04:18+5:302022-11-17T11:05:54+5:30

Pushpa Movie Srivalli Dance of Allu Arjun by South Korean Girl Viral Video : भारतातच नाही तर परदेशातही हा चित्रपट आणि हे गाणे चांगलेच गाजले.

Pushpa Movie Srivalli Dance of Allu Arjun by South Korean Girl Viral Video : The magic of 'Pushpa' continues even abroad; Watch Korean girl's amazing dance on 'Srivalli' song... | परदेशातही ‘पुष्पा’ची जादू कायम; पाहा कोरीयन तरुणीचा ‘श्रीवल्ली’गाण्यावरचा भन्नाट डान्स...

परदेशातही ‘पुष्पा’ची जादू कायम; पाहा कोरीयन तरुणीचा ‘श्रीवल्ली’गाण्यावरचा भन्नाट डान्स...

Highlightsलाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३ लाखांहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. ही तरुणी त्याच्यासारखेच कपडे आणि गॉगल लावून अतिशय परफेक्ट स्टेप्स करताना दिसते.

पुष्पा चित्रपट येऊन इतके दिवस झाले तरी त्याची जादू आजही कायम असल्याचे दिसते. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले. या गाण्याचे म्युझिक आणि त्याच्या स्टेप्स लोकांना आव़डल्याने त्यांनी हे गाणे अक्षरश: डोक्यावर घेतले. सोशल मीडियावरही हा चित्रपट आल्यानंतर कित्येक महिने या गाण्याचीच हवा होती. भारतातच नाही तर परदेशातही हा चित्रपट आणि हे गाणे चांगलेच गाजले. नुकतेच त्याचेच एक उदाहरण समोर आले असून कोरीयामधील एक तरुणी या गाण्यावर अतिशय भन्नाट डान्स करताना दिसली (Pushpa Movie Srivalli Dance of Allu Arjun by South Korean Girl Viral Video). 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून या तरुणीचे सगळे कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शर्ट पँटमध्ये साऊथ कोरीयन तरुणी या डान्सच्या स्टेप्स करताना दिसत आहे. घरातच तिच्या मागे टीव्हीवर हे गाणे लावले असून त्यात अल्लू अर्जून दिसत आहे. आणि टीव्हीच्या समोर ही तरुणी त्याच्यासारखेच कपडे आणि गॉगल लावून अतिशय परफेक्ट स्टेप्स करताना दिसते. या स्टेप्स करताना तिच्या पायातील स्लिपर निघते, पण ती घालून ती पुन्हा डान्स कंटीन्यू करते. 

भाषा, भाव समजत नसूनही परदेशी व्यक्तीने भारतीय गाण्यावर डान्स करणे ही खरंच खास गोष्ट आहे. याआधीही भारतीय गाण्यांवर परदेशी लोकांनी डान्स केल्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यात आता आणखी एक भर पडली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला असला तरी तो अजूनही व्हायरल होत आहे. लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३ लाखांहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या असून या कोरीयन तरुणीच्या डान्सचे बऱ्याच जणांनी कौतुक केले आहे. “तुम्ही विचार करता त्यापेक्षा हा डान्स अवघड आहे. अल्लू अर्जूनचे कोरीयन व्हर्जन” अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.  

Web Title: Pushpa Movie Srivalli Dance of Allu Arjun by South Korean Girl Viral Video : The magic of 'Pushpa' continues even abroad; Watch Korean girl's amazing dance on 'Srivalli' song...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.