Join us  

इतक्या तासांच्या मेकअपनंतर अल्लू अर्जून बनायचा 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:34 PM

Pushpa: The Rise : अल्लू अर्जून 'असा' बनला पुष्पाराज; मेकअप आर्टिस्टनं शेअर केला ट्रांसफॉर्मेशनचा अनुभव

पुष्पराज- द (Pushpa: The Rise) राइज जगभरातील बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत यशाचं शिखर गाठत आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत त्याच्या OTT प्रीमियरपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने नुकताच १०० कोटींचा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. हा 2021 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक बनला आहे. या चित्रपटाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे अभिनेत्याचा लूक.

या चित्रपटातील अभिनेत्याचा लुक मेकअप आर्टिस्ट आणि प्रोस्थेटिक लुक डिझायनर प्रीतीशील सिंग डिसूझानं तयार केला आहे.  प्रोस्थेटिक लुक डिझायनर म्हणते की, ''चित्रपटातील त्याच्या खात्रीशीर लूकचे संपूर्ण श्रेय ती घेऊ शकत नाही. अभिनेत्याच्या मेहनतीमुळेच तो पडद्यावर इतका खात्रीलायक दिसला. त्याच्या भूमिकांबद्दलच्या समर्पणाचे वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत," अलीकडच्या एका व्हिडीओमध्ये या चित्रपटासाठी अल्लूचे परिवर्तन दिसून येत आहे. यात अभिनेता आपला परफेक्ट पुष्पा लूक साकारताना दिसत आहे. त्याच्या भुवया आणि कुरळे केस अगदी अचूक त्वचेचा रंग मिळवण्यापर्यंत, अभिनेत्याने मेकअपसाठी कष्ट घेतले आहेत. 

डिसूझाने तिच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. या प्रकल्पावर काम करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल ती सांगते, “हा माझा दक्षिणात्य चित्रपटातील पहिला, खूप वेगळा आणि वास्तविक अनुभव होता. खुर्चीवर बसलेल्या अल्लू अर्जुनला तयार होण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागायचा. कारण कधीकधी त्यांना पूर्ण-शरीराचा मेकअप करण्याची गरज भासायची.''

अल्लू त्याच्या कामासाठी अत्यंत समर्पित आहे आणि अभिनेत्याच्या प्रामाणिकपणाचे आणि परिश्रमाचे वर्णन करताना तिच्याकडे शब्द कमी पडतात. ती पुढे सांगते की, “त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अप्रतिम होता. तो एक फुल ऑन एंटरटेनर आहे. तो त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये पूर्णपणे शिरतो, ज्या क्षणी तो पडद्यावर येतो, तुम्हाला दुसरे काही पाहावेसे वाटत नाही. मला वाटते त्या संपूर्ण फ्रेमवर तो मात करू शकतो. तो एक अत्यंत संयमशील अभिनेता आहे, ज्यामुळे टेक्निशिटन्सचे काम खूप सोपे झाले.''

सुकुमार दिग्दर्शित आणि Mythri Movie Makers आणि Muttamsetty Media च्या बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटात फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, जगदीश प्रताप भंडारी, सुनील, राव रमेश, धनंजया, अनसूया भारद्वाज, समंथा रूथ प्रभू आणि अजय घोष यांच्याही भूमिका कमालीच्या आहेत.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनसेलिब्रिटी