साबणाचा वापर आपण दररोज करतो. यामुळे शरीर तर स्वच्छ होते, शिवाय किटाणू देखील निघून जातात. ज्यामुळे आपण सहसा लवकर आजारी पडत नाही. आपल्या घरात आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा आणि भांड्याचा साबण वेगळा असतो. परंतु, त्याऐवजी साबणाचा वापर इतर ठिकाणी होतो का? सध्या साबणाचा वापर कमी होत चालला आहे. साबणाऐवजी लोकं लिक्विडवॉशचा वापर करतात.
बॉडीवॉश आणि हँडवॉश सुरू झाल्यापासून, अनेक वेळा साबण वापरले जात नाहीत. पण याचा वापर आपण वॉर्डरोबमध्ये करू शकता. कालबाह्य झालेल्या साबणाचा वापर कपड्याच्या कपाटात कसा करावा? याने खरंच काही फरक पडतो का? वॉर्डरोबमध्ये साबण ठेवण्याचे फायदे कोणते पाहूयात(Put a bar of soap in your closet/dresser to keep clothes smelling fresh).
वॉर्डरोबमध्ये साबण ठेवण्याचे फायदे
कपड्यांच्या कपाटात साबणाचा बार ठेवल्याने कपड्यांमध्ये सुगंध कायम राहतो. याशिवाय कपड्यांमध्ये बुरशी येण्याचा धोकाही कमी होतो. आपण साबण अंडरगारमेंट्सच्या ड्रॉवरमध्ये ठेऊ शकता. आपण साबण सुती कापडात गुंडाळून ठेऊ शकता. असे केल्याने साबण ओलसरपणामुळे वितळणार नाही, व यामुळे इतर कपडेही खराब होणार नाही.
दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर
शू रॅकसाठी फायदेशीर
बहुतांश लोकांच्या बुटांमधून दुर्गंधी येते, व ही दुर्गंधी घरभर पसरते. शिवाय घरातच शू रॅक ठेवल्यास संपूर्ण वातावरण दुर्गंधीयुक्त होते. अशा वेळी आपण सुती कापडात साबण गुंडाळून, रॅकवर ठेऊ शकता. यामुळे काही मिनिटात शू रॅक दुर्गंधीमुक्त होऊन जाईल.
साबणाचे इतर वापर
- कीटकांच्या चाव्यामुळे कधीकधी वेदना आणि जळजळ होते. अशावेळी आपण अँटीसेप्टिक क्रीम लावतो. पण जर आपल्याकडे अँटीसेप्टिक क्रीम नसेल तर, आपण साबणाचा वापर करू शकता.
दिवाळीच्या साफसफाईत झुरळांचा बंदोबस्त करा, ४ सोप्या टिप्स- झुरळं होतील घरातून गायब
- आपण उरलेल्या साबणाचा रूम फ्रेशनर तयार करू शकता. यामुळे घरभर सुगंध पसरेल, शिवाय कीटकही घरामध्ये फिरकणार नाही.
- झाडांवरून कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण साबणाचा वापर करू शकता. आपण उरलेल्या साबणाचा स्प्रे तयार करून फवारणी करू शकता.