सध्या प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशिन असतेच (Washing Machine). ज्यात मेहनत न घेता, वेळेची बचत होऊन कपडे धुतले जातात. यासह कपडे सुकवण्यातही मदत होते. पण वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना, कपड्यांवर सुरकुत्या पडतात (Cleaning Tips). अनेकांना वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत ठाऊक नाही. चुकीच्या पद्धतीने कपडे धुतल्यास मशीन खराब होऊ शकते. अनेकदा कपड्यांवर डिटर्जेंटचे डाग तसेच राहतात. ज्यामुळे बऱ्याचदा कपडे पुन्हा बादलीत बुचकळून धुवावे लागतात.
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना एकमेकांमध्ये अडकतात. ज्यामुळे कपड्यांवर सुरकुत्या पडतात. ज्यामुळे इस्त्रीचा वेगळा खर्च वाढतो. यावर उपाय म्हणून आपण ॲल्युमिनियम फॉइलची मदत घेऊ शकता. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. पण ॲल्युमिनियम फॉइलचा (Aluminium Foil) नेमका वापर कसा करावा? पाहा(Put Aluminum FOIL in WASHING MACHINE & DRYER!! then see Magic).
लसूण कच्चा खावा की भाजलेला? आहारतज्ज्ञ म्हणतात ४ गोष्टींसोबत खा; मिळतील फायदेच - फायदे
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यावर सुरकुत्या पडणार नाही
- ॲल्युमिनियम फॉइलचा वापर आपण वॉशिंग मशिनमध्ये करू शकता. यासाठी ॲल्युमिनियम फॉइल किंवा सिल्व्हर फॉइलचे तुकडे करा. त्या तुकड्यांचे टेनिस बॉलच्या आकाराचे रोल करून बॉल तयार करा. नंतर त्यात बॉल कपड्यांसोबत वॉशिंग मशिनमध्ये घाला.
- फॉइल बॉल्स वॉशिंग मशिनमध्ये फिरताना, कपड्यांच्या पृष्ठभागावर हळुवारपणे घासले जातात. ज्यामुळे कपड्यांवर सुरकुत्या दिसत नाही. आणि कपडे इस्त्रीशिवाय सरळ दिसतात.
- हे ॲल्युमिनियम फॉइल बॉल्स आपण ड्रायरमध्येही घालू शकता. यामुळे विजेची बचत होते, आणि कपडे इस्त्रीशिवाय मऊ आणि सरळ दिसतात.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज खा ४ गोष्टी, LDL कोलेस्टेरॉल होईल कमी - राहाल फिट
- यामागील विज्ञान असे आहे की, वॉशिंग मशिन आणि ड्रायरमध्ये कपडे घासल्याने इलेक्ट्रॉनचे हस्तांतरण होते, ज्यामुळे चार्ज तयार होते. आणि कपडे एकमेकांना चिकटतात आणि सुरकुत्या तयार होतात.
- ड्रायर आणि वॉशिंग मशिनमध्ये फॉइल बॉल्स कपड्यांचा चार्ज काढून टाकतात. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्या इस्त्री न करता सरळ दिसतात.