Join us  

प्यार तुने क्या किया...प्रियकराशी लग्न करायचं म्हणून 'ती' बांगलादेशातून पोहत भारतात पोहचली..पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2022 11:09 AM

प्रेम आंधळं असतं म्हणतात ते खोटं नाही, प्रेमासाठी १ तास पोहत भारतात आलेल्या तरुणीचे पुढे काय झाले वाचा....

ठळक मुद्देयाआधी बांग्लादेशातील एक पौगंडावस्थेतील मुलगा चॉकलेट खरेदी करण्यासाठी अशाचप्रकारे पोहत भारतात आला होता.३ दिवसांपूर्वीच कृष्णाने कोलकाता येथील कालीघाट मंदिरात अभिक याच्याशी विवाह केला.

प्यार के लिए कुछ भी असं म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा प्रेमात पडलो की त्यासाठी आपली काहीही करायची तयारी असते. आपलं प्रेम खरं आहे हे दाखवून देण्यासाठी किंवा प्रेमाची ताकद म्हणून आपण समोरच्यासाठी जीवाच्या पलिकडे जाऊन काही गोष्टी करत असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे भारतातील आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बांग्लादेशमधील एक तरुणी थेट पोहतच भारतात पोहोचली. सुंदरबनमार्गे भारतात येणे फारसे अवघड नसल्याने तिने हा मार्ग निवडला. सुरुवातीला जंगलातून नदीपर्यंत पोहोचल्यावर नदीतून पोहत ती भारतात आली. हे अंतर पार करण्यासाठी तिला एक तासाचा कालावधी लागला. प्रेमापुढे दुसरे काहीच महत्त्वाचे नसल्याचे तिच्या या कृतीतून दिसून आले.  

(Image : Google)

त्याचे झाले असे की कृष्णा मंडल ही २२ वर्षांची तरुणी आणि भारतातील अभिक मंडल हे एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांची फेसबुकद्वारे ओळख झाली. कृष्णाकडे पासपोर्ट नसल्याने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी भारतात यायचे कसे असा प्रश्न तिच्यापुढे होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी तिने थेट पोहत भारतात यायचे ठरवले. विशेष म्हणजे सुंदरबनच्या जंगली भागातून ती एक तास पोहत भारताच्या सीमेवर पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार कृष्णा आधी रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या सुंदरबनात पोहोचली. त्यानंतर नदीमार्गे पोहत ती संबंधीत ठिकाणी पोहोचली. विशेष म्हणजे एकटीने अशाप्रकारे कृत्य करण्याची भिती तिला वाटली नसेल का असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.

(Image : Google)

३ दिवसांपूर्वीच कृष्णाने कोलकाता येथील कालीघाट मंदिरात अभिक याच्याशी विवाह केला. मात्र त्यानंतर देशात अवैधरित्या प्रवेश केल्याच्या कारणावरुन तिला पोलिसांनी अटक केली. तिला बांग्लादेश हाय कमिशनकडे सोपविण्यात येईल असे सांगण्यात येत असून अशाप्रकारे धाडस करणाऱ्या या तरुणीच्या धैर्याबाबत आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे. याआधी बांग्लादेशातील एक पौगंडावस्थेतील मुलगा चॉकलेट खरेदी करण्यासाठी अशाचप्रकारे पोहत भारतात आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांच्या हवाली करुन न्यायालयाच्या आदेशानुसार १५ दिवसांच्या पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते.  

टॅग्स :सोशल व्हायरललग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबांगलादेश