Lokmat Sakhi >Social Viral > 'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan चक्क मेहंदीमध्ये काढला 'क्युआर कोड'! बहिणीने लढवली शक्कल - व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 12:22 PM2023-08-30T12:22:36+5:302023-08-30T12:23:43+5:30

'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan चक्क मेहंदीमध्ये काढला 'क्युआर कोड'! बहिणीने लढवली शक्कल - व्हिडिओ व्हायरल

'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan | 'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

बहिण - भावाच्या गोड नात्याचा सण म्हणजेच रक्षा बंधन. बहीण भावाला ओवाळून राखी बांधते. व भाऊ बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो. यासोबतच बहिणीला ओवाळणी म्हणून भेटही देतो. यादिवशी बहिण नटून - थटून भावाला ओवाळते. साडी नेसून, हातावर मेहेंदी काढून, केसात गजरा माळुन बहिण भावाला ओवाळण्यासाठी तयार होते.

सध्याचं जग डिजिटल आहे. यामुळेच ओवाळणी म्हणून देणारी भेटवस्तू किंवा पैसे देखील डिजिटल पद्धतीने देण्यात येते. मात्र, एका बहिणीने गिफ्ट घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. तिने चक्क क्यूआर कोडची मेहेंदी हातावर रचली आहे. सध्या या मेहेंदीची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे('QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan).

लेकीला सहावीत गणितात मिळाले १५ पैकी शून्य मार्क; आई म्हणाली शाबास बाळा..

क्यूआर कोड

सध्या यूपीआय पेमेंटचा जमाना आहे. हातात कॅश जरी नसली तरी, आपण मोबाईल फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआय पेमेंटद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो. एका मुलीने हेच लक्षात घेऊन, चक्क आपल्या मेहंदीमध्येच क्यूआर कोडचं डिझाईन तयार केलं आहे. याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलीच्या हातावर क्युआर कोड दिसून येत आहे. व तिचा भाऊ कोड स्कॅन करून तिला रक्षा बंधनाची ओवाळणी म्हणून पैसे ट्रान्सफर करीत आहे. आपण देखील या प्रकारची मेहेंदी डिझाईन काढून भावाला सरप्राईज देऊ शकता.

मुलाचं नाव चंद्रयान, मुलीचं चांदनी; इस्त्रोला सलाम करणाऱ्या गोरगरीब पालकांची अनोखी भेट

लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काही जण या व्हिडिओचं कौतुक करताना दिसून येत आहेत. 'फेक असो वा खरं, ही आयडिया खरंच भारी आहे' असं एका यूजरने म्हटलं आहे. तर, दुसऱ्याने 'कलाकाराला ११ तोफांची सलामी दिली पाहिजे.' असं कमेंट केलं आहे. तर एकाने 'डिजिटल इंडिया' मोहिमेमुळे काय काय पहावं लागणार आहे', असं म्हटलं आहे.

Web Title: 'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.