Lokmat Sakhi >Social Viral > Easy Home Cleaning Tips : रोज कितीही पसारा आवरला तरी घर तसंच दिसतं? नीटनेटक्या घरासाठी ५ टिप्स, झटपट घर होईल  स्वच्छ

Easy Home Cleaning Tips : रोज कितीही पसारा आवरला तरी घर तसंच दिसतं? नीटनेटक्या घरासाठी ५ टिप्स, झटपट घर होईल  स्वच्छ

Quick Easy Home Cleaning Tips : कधी-कधी आपलं घर घाण नसतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ते घाण दिसतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 01:02 PM2022-02-27T13:02:27+5:302022-02-27T13:30:28+5:30

Quick Easy Home Cleaning Tips : कधी-कधी आपलं घर घाण नसतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ते घाण दिसतं.

Quick Easy Home Cleaning Tips : 5 reasons why your house is looking messier | Easy Home Cleaning Tips : रोज कितीही पसारा आवरला तरी घर तसंच दिसतं? नीटनेटक्या घरासाठी ५ टिप्स, झटपट घर होईल  स्वच्छ

Easy Home Cleaning Tips : रोज कितीही पसारा आवरला तरी घर तसंच दिसतं? नीटनेटक्या घरासाठी ५ टिप्स, झटपट घर होईल  स्वच्छ

तुम्ही स्वत:च्या किंवा इतर कोणाच्याही घरात प्रवेश केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल घरात पसारा पडला असेल तर खूप किळस वाटते. इम्प्रेशनही खराब होतं. अचानक कोणीही पाहूणे आले आणि घर अस्वच्छ दिसलं तर ऐनवेळी काय करावं सुचत नाही. (Easy Home Cleaning Hacks) घराची साफ सफाई करताना किंवा पसारा आवरताना काही लहान सहान चुका टाळल्या तर नक्कीच घर नीटनेटकं दिसेल आणि तुमचा वेळही वाचेल. कधी-कधी आपलं घर घाण नसतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ते घाण दिसतं.(Easy Cleaning Tricks and Tips) आपल्या काही चुकांमुळे घर नेहमी अस्वच्छ दिसतं. जर तुम्ही तुमच्या घरात या चुका केल्या तर तुमचे घर नेहमीच अस्वच्छ दिसेल. (How to clean your house spotless fast)

1) टेबलवर जास्त सामान ठेवू नका

टेबलावर तुमचा सामान अगदी व्यवस्थित ठेवलेला असला तरीही, त्यावरील धूळ, आणि सहान लहान गोष्टींमुळे ते नेहमी  खराब दिसू शकतं. म्हणून धूळ रोजच्या रोज स्वच्छ करा. वापर झाल्यानंतर लॅपटॉप, किबोर्ड इतर साहित्यावर एक कॉनटचं कापड झाकून ठेवू शकता जेणेकरून धूळ लागणार नाही.  छोटे डबे, क्रीम-लोशन, औषधं, छोट्या छोट्या गोष्टी कपाटात ठेवा.  यासाठी बंद कपाटही वापरू शकता. तुम्ही लहान प्लास्टिक ड्रॉर्सचा संच घेऊ शकता जेणेकरून वस्तू तुमच्या समोर दिसणार नाहीत.

'हा' त्रास असलेल्यांनी रात्री चुकूनही दूध पिऊन झोपू नये; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

२) गरजेपेक्षा  जास्त चादरी,उषा वर काढून ठेवू नका

घरात गरजेपेक्षा जास्त उशा, चादरी वर ठेवल्यानं विनाकारण त्यावर धूळ जमा होत जाते. त्यापेक्षा तुम्ही लागतं तेव्हढंच सामान वर ठेवा आणि बाकीचं आत पलंगात किंवा कपाटात ठेवून घ्या.  अंथरूणं कधीच उघडी  ठेवू नका. नेहमीच एक पातळ कापड त्यावर झाकून ठेवा. 

३) कमी जागेत जास्त फर्निचर

खोली जितकी मोकळी आणि रिकमी दिसेल तितकीच ती छान दिसेल. लहान जागेत जास्त फर्नीचर ठेवल्यानं धूळ, घाण जमा होऊ  शकते. यामुळे तुमचं घर अव्यवस्थित दिसू शकतं. म्हणून घरात कमी जागा असले तर मोठया आकाराचे फर्निचर निवडू नका, शक्यतो घर हवेशीर, मोकळं दिसेल अशी फर्नीचरची रचना ठेवा.

केस पांढरे व्हायला सुरूवात झालीये? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा; म्हातारे होईपर्यंत  राहतील काळेभोर केस

४) खिडक्यांवर लक्ष देणं

खिडक्या उघडणे, चांगले पडदे लावणे चांगले आहे, पण खिडकीच्या काचेवर धूळ साचत असेल तर ती रोज साफ करणे देखील आवश्यक आहे. त्याकडे लक्ष देणे थांबवले तर खिडक्या, लाकडी दरवाजे इत्यादींच्या काचेवर धूळही लवकर जमा होते आणि ते लवकर दिसू लागते. खिडक्या अशाच सोडल्या तर वारंवार साफ करूनही त्या घराला घाण करतात. दररोज खिडक्या उघडा आणि सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात येऊ द्या आणि त्याच वेळी  दररोज खिडक्या देखील स्वच्छ करा.

पोट, मांड्यांवरची वाढलेली चरबी पटकन होईल कमी; मेंटेन फिगरसाठी रात्रीच्या जेवणाआधी हे एक काम  करा

५) वेळच्यावेळी पडदे धुवा

कार्पेट आणि पडदे रोज धुतले जाऊ शकत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की ते महिनोंमहिने असेच ठेवले पाहिजेत. जर तुम्ही ते साफ करू शकत नसाल किंवा ते धुवू शकत नसाल, तरीही तुम्ही त्यांना व्हॅक्यूम क्लिनरनं स्वच्छ करू शकता. त्यामुळे घर अधिक चांगलं दिसतं. महिन्यातून किमान २ वेळा तुम्ही तुमचे कार्पेट, पडदे, टेबल कव्हर, टीव्ही कव्हर  साफ करत राहा. जेणेकरून घरात जास्त धूळ जमा होणार नाही. 

Web Title: Quick Easy Home Cleaning Tips : 5 reasons why your house is looking messier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.