Join us  

केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स - रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 5:47 PM

5 TIPS TO EASILY CLEAN A RUBBER BAND : केसांना लावायचे रबर बँड रोज वापरुन तेलकट झाल्यास ते स्वच्छ करण्याचे ५ सोपे उपाय...

पोशाखानुसार वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणे सगळेच पसंत करतात. अशा अनेक प्रकारच्या हेअरस्टाईल करण्यासाठी काही महत्वाच्या हेअर ऍक्सेसरीज लागतात. हेअर बँड, क्लिप, हेअर पीन, रबर बँड अशा बेसिक हेअर ऍक्सेसरीज आपण रोज वापरतो. बेसिक कुठलीही हेअरस्टाईल केली किंवा अगदी साधी वेणी, पोनी टेल बांधला तर रबर बँड हा लागतोच(quick & easy tips to remove hair oil stains from rubber band).

 असे रबर बँड रोज वापरून खराब होतात. काहीवेळा आपण केसांना तेल लावतो आणि तसेच केस बांधतो, त्यामुळे हे रबर बँड तेलकट होतात.  असे अस्वच्छ रबर बँड रोज वापरले तर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच हे रबर बँड वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते. रबर बँड स्वच्छ करण्याच्या काही साध्यासोप्या ट्रिक्स(How do you remove black stains from rubber band). 

रबर बँड स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स.... 

१. डिटर्जंट :- एका छोट्या वाटीत १/२ टेबलस्पून डिटर्जंट घेऊन त्यात गरम पाणी ओतावे. हे मिश्रण चमच्याने ढवळून पाण्यांत डिटर्जंट विरघळवून घ्यावे. आता यात रबर बँड किमान अर्धा तास भिजत ठेवावेत. त्यानंतर रबर बँड हलक्या हातांनी चोळून त्यावरील तेलकटपणा काढून टाकावा. आता हे रबर बँड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. हे रबर बँड उन्हात वाळवून घ्यावेत. 

२. बेकिंग सोडा :- रबर बँड स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करु शकता. एका वाटीत १ टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ब्रशच्या मदतीने ही पेस्ट रबर बँडवर लावून १५ ते २० मिनिटे ती पेस्ट अशीच रबर बँडवर सुकू द्यावी. त्यानंतर हलकेच रबर बँड रगडून घ्यावेत. यामुळे त्यावरील तेलकट - चिकट डाग सहज निघून जातील. आता हे रबर बँड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत व व्यवस्थित सुकवावेत.  

कढई - पातेली रोज वापरुन काळीकुट्ट झाली ? पाहा, कोळशाचा लहानसा तुकडा करेल जादू...  

३. लिंबाचा रस :- लिंबाच्या रसाच्या मदतीने देखील आपण रबर बँडवरील तेलकट डाग सहज काढू शकता. एका वाटीत लिंबाचा रस काढून घ्यावा. ब्रशच्या मदतीने लिंबाचा रस रबर बँडवर लावावा, किंवा आपण लिंबाच्या रसात रबर बँड भिजवून ठेवू शकता. १० ते १५ मिनिटे रबर बँडवर लिंबाचा रस असाच लावून ठेवावा. त्यानंतर हातांनी रबर रगडून स्वच्छ करुन घ्यावेत. आता स्वच्छ पाण्याने रबर बँड धुवून घ्यावेत. अशाप्रकारे आपण तेलकट झालेले रबर बँड स्वच्छ करुन पुन्हा वापरु शकता. 

जीन्स न धुता भरपूर वापरता? त्वचेचे आजार लागतील मागे, तज्ज्ञ सांगतात जीन्स धुताना काय करा..

४. व्हिनेगर :- एका छोट्या वाटीत व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणांत घेऊन त्याचे मिश्रण बनवावे. त्यानंतर रबर बँड १० ते १५ मिनिटांसाठी या मिश्रणांत भिजवून ठेवावेत. थोड्यावेळाने, रबर बँड पाण्याने स्वच्छ धुवून वाळवण्यासाठी उन्हांत ठेवावेत. 

५. टूथपेस्ट :- आपण टूथपेस्टचा वापर करून देखील तेलकट झालेले रबर बँड चटकन स्वच्छ करु शकतो. ब्रशच्या मदतीने टूथपेस्ट रबर बँडवर लावून घ्यावी. त्यानंतर हातांनी रगडून रबर बँड साफ करुन घ्यावेत. सगळ्यांत शेवटी रबर बँड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स