स्वयंपाकघराची रोज कितीही स्वच्छता केली तरी काही वस्तू, कोपरे काळपट पडलेले दिसतात. (Kitchen Cleaning Hacks) स्वीच बोर्डवर तेल, मसाल्यांचे हात लागल्यानं त्यावर घाणीचे थर जमा होतात. स्वीच बोर्ड साफ करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हवीतशी स्वच्छता दिसून येत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही स्विच बोर्ड अगदी नवं कोरं बनवू शकता. (Quick Home Cleaning Tips)
कोणताही स्विच बोर्ड साफ करणे खूप सोपे आहे, परंतु काही वेळा धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, मुख्य स्विचमधून वीज खंडित करा. वीज घालवताना घरातील सर्वांना कळवा, कारण कधी कधी कोणी नकळत वीज बंद, सुरू केली तर अडचणी वाढू शकतात. (How to clean switch board with baking soda)
1) बेकिंग सोडा
घाणेरडा स्विच बोर्ड साफ करण्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही याआधी बेकिंग सोडा वापरून बरीच साफसफाई केली असेल, परंतु आता तुम्ही त्याचा वापर करून काळे झालेले स्विच बोर्ड उजळवू करू शकता. स्विच बोर्ड साफ करण्यासाठी ४ टिप्स वापरा.
भारतीय महिला होतात पुरुषांपेक्षा 'लवकर' सेक्शुअली ऍक्टिव्ह; Sex Life चं गुपीत सांगणारा रिसर्च समोर
सर्व प्रथम, एक कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा चांगला मिसळा. आता या मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस घालून चांगले फेटून घ्या. यानंतर या मिश्रणात जुना टूथब्रश बुडवून स्वीच बोर्डवर लावा. एक ते दोन मिनिटं घासून स्वच्छ कापडाने पुसून टाका. तुम्हाला लगेचच दिसून येईल की स्विच बोर्ड स्वच्छ झाला आहे.
२) बेकींग सोडा आणि टुथपेस्ट
बेकिंग सोडा आणि टूथपेस्टचे मिश्रण देखील स्विच बोर्ड साफ करण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. यासाठी प्रथम एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा टूथपेस्ट टाका, ते चांगले मिसळा आणि मिश्रण सेट होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. सुमारे 5 मिनिटांनंतर, टूथपेस्ट मिश्रणात बुडवा आणि स्विच बोर्डवर चांगले लावा आणि 2 मिनिटे सोडा. 2 मिनिटांनंतर, त्याच टूथब्रशने चांगले स्क्रब करा आणि कापडाने स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात व्हिनेगरही घालू शकता.
३) हे लक्षात ठेवा
ज्याप्रमाणे स्वीच बोर्ड साफ करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे साफ केल्यानंतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक असते. स्विच बोर्ड साफ केल्यानंतर, सुमारे 30-40 मिनिटे स्विच सुरू करू नका. जेव्हा तुम्हाला बोर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा नसल्याचे जाणवेल तेव्हाच ते सुरू करण्याचा प्रयत्न करा. स्वीच बोर्ड सुरू करताना पायात चप्पल आणि हातात हातमोजे घाला.