Join us  

२ मिनिटांत निघतील फरशीवरचे गंजलेले हट्टी डाग; ३ टिप्स- घर दिसेल नवं-कोरं स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 12:44 PM

Quick Home Hacks : गंजाचे डाग स्वच्छ करण्यासासठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे कमी खर्चात तुम्हाला घर स्वच्छ करता येईल. (How to clean cylinder marks from tiles with home hacks)

स्वयंपाकघरात कसले ना कसले डाग नेहमीच पडत राहतात. त्यामुळे फरश्यांचा रंग आणि चमक खराब होते. किचनच्या टाईल्स पांढऱ्या असतील आणि त्यावर मसाल्यांचे डाग लागले असतील तर हे डाग निघता निघत नाहीत. (Quick Home Hacks) घरात तुम्ही ज्या ठिकाणी सिलेंडर ठेवता तिथे हट्टी डाग जमा होतात. हे गंजाचे डाग निघता निघत नाहीत. गंजाचे डाग स्वच्छ करण्यासासठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे कमी खर्चात तुम्हाला घर स्वच्छ करता येईल. (How to clean cylinder marks from tiles with home hacks)

लिंबू

लिंबाच्या रसात मीठ मिसळून गंजलेल्या डागांवर चोळा. १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. गंजाच्या खुणा नाहीशा होतील. लिंबामध्ये मीठाऐवजी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यामुळे भांड्यावरील गंजाच्या खुणाही दूर होतील.

व्हिनेगर

टाइल्सवरील सिलेंडरच्या गंजजाचे डाग सहजपणे साफ करण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरतं. याचा वापर करून तुम्ही 5 मिनिटांत हट्टी ते हट्टी डाग साफ करू शकता. जर घरी व्हिनेगर नसेल तर तुम्ही ते बाजारातूनही विकत घेऊ शकता. डाग दूर करण्यासाठी  एका भांड्यात व्हिनेगर घाला. आता त्यामध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. साहित्य मिक्स केल्यानंतर, मिश्रण काही वेळ तसंच राहू द्या. यानंतर, डाग असलेल्या भागावर मिश्रण लावा आणि 5 मिनिटे सोडा. 5 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने घासून स्वच्छ करा.

अमोनिया पावडर

अमोनिया पावडर आणि व्हिनेगर वापरून किचन टाइल्सवरील हट्टी सिलेंडरचे डाग देखील सहज साफ करता येतात.  अमोनिया पावडर डागांचे क्रिस्टल्स सक्रिय करते आणि व्हिनेगर ते साफ करते. यासाठी सर्व प्रथम, एका भांड्यात व्हिनेगर आणि अमोनिया पावडर टाका आणि ते चांगले मिसळा. आता हे मिश्रण डाग असलेल्या भागावर काही वेळ राहू द्या. काही वेळाने, क्लिनिंग ब्रश आणि सॅण्डपेपरने घासून स्वच्छ करा.

पोट सुटलंय, मांड्या बेढब दिसतात? स्वयंपाकघरातील ५ पदार्थ; आजपासूनच खा, स्लिम, मेटेंन दिसाल

फर्निचरचे डाग कसे स्वच्छ करायचे?

फर्निचरच्या गंजलेल्या भागावर व्हिनेगर लावा आणि 24 तास राहू द्या. २४ तासांनंतर ज्या ठिकाणी व्हिनेगर लावले आहे ती जागा हलक्या हातांनी घासून ओल्या कापडाने पुसून टाका. 

टॅग्स :किचन टिप्ससुंदर गृहनियोजन